AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाद करा पण आमचा कुठं! गप्टीलने डोळे दाखवले, दीपक चाहरने पुढच्या बॉलवर विकेट घेतली, पाहा VIDEO

भारत आणि न्यूझीलंड (INDvsNZ) यांच्यातील पहिल्या T20 सामन्यात भारताने पाच गडी राखून विजय मिळवला आहे. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियम (SMS) येथे हा सामना खेळवण्यात आला.

नाद करा पण आमचा कुठं! गप्टीलने डोळे दाखवले, दीपक चाहरने पुढच्या बॉलवर विकेट घेतली, पाहा VIDEO
Deepak Chahar
| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 1:17 PM
Share

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड (INDvsNZ) यांच्यातील पहिल्या T20 सामन्यात भारताने पाच गडी राखून विजय मिळवला आहे. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियम (SMS) येथे हा सामना खेळवण्यात आला. भारताकडून सूर्यकुमार यादव आणि नवा कर्णधार रोहित शर्मा यांनी शानदार खेळी साकारली. टी-20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर भारतीय संघाने विजयासह नवी सुरुवात केली आहे. प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचाही हा पहिलाच सामना होता. या सामन्यात भारताच्या गोलंदाजीवेळी मार्टिन गप्टिल आणि दीपक चाहर एकही शब्द न बोलता भिडल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी केवळ नजरेने एकमेकांवर कुरघोडी करायचा प्रयत्न केला. (India vs New Zealand: Deepak Chahar wins battle of ‘cold stares’ after Martin Guptill’s no-look six)

न्यूझीलंडच्या फलंदाजीदरम्यान मार्टिन गप्टिलने 18 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दीपक चाहरच्या गोलंदाजीवर शानदार षटकार ठोकला. षटकार ठोकल्यानंतर तो काही वेळ दीपककडे पाहात राहिला. त्याने बराच वेळ दीपककडे रोखून पाहिलं आणि त्यानंतर काही वेळाने त्याने बॉल कुठे गेलाय ते पाहिलं. त्यानंतर दीपकने एक फुल लेंथ बॉल टाकला. या बॉलवर गप्टील श्रेयस अय्यरकडे झेल देत बाद झाला. त्यानंतर दीपकने गप्टीलकडे रोखून पाहिलं. दोघांचेही फोटो फोटो सोशल मीडियावर खूप शेअर होत आहेत.

मार्टिन गुप्टिलच्या खेळीबद्दल सांगायचे तर, त्याने 31 चेंडूंमध्ये 19 वे टी-20 आंतरराष्ट्रीय अर्धशतक पूर्ण केले. दीपक चहरच्या गोलंदाजीवर झेलबाद होण्यापूर्वी त्याने 42 चेंडूत 70 धावांची धडाकेबाज खेळी खेळली होती. मार्टिन गप्टिलने आपल्या खेळीत 4 षटकार आणि 3 चौकार लगावले.

गप्टीलच्या या खेळीच्या जोरावर किवी संघाला 164 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले. या विजयासह भारताने घरच्या मैदानावर सलग 9 टी-20 सामने जिंकले आहेत. सूर्यकुमार यादवने कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले.

भारताची न्यूझीलंडवर मात

उभय संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यानंतर न्यूझीलंडने 164 धावा केल्या. भारताने या धावांचा पाठलाग करताना सुरुवातीपासून चांगला खेळ दाखवला. सूर्यकुमार आणि रोहितने उत्तम खेळी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. रोहितने 36 चेंडूक 48 धावा केल्या. तर सूर्यकुमारने सर्वाधिक 40 चेंडूत 62 धावा केल्या. पण सूर्यकुमार बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर दोघेही झटपट बाद झाले. ज्यामुळे अखेरच्या अखेरच्या 3 चेंडूत भारताला विजयासाठी 3 धावांची गरज होती. अशा वेळी आक्रमक फलंदाज ऋषभ पंतने चौकार लगावत सामन्यात विजय मिळवला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 टी-20 सामने खेळवले जाणार असून यातील पहिला सामना भारताने जिंकल्याने भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. यानंतर पुढील दोन सामन्यानंतर उभय संघांमध्ये 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

इतर बातम्या

T20 World Cup 2021 मध्ये भारतीय संघात स्थान न मिळालेल्या चहलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

ICC कडून सौरव गांगुलीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, क्रिकेटशी संबंधित नियम-कायदे बनवणार

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार? क्रीडा मंत्र्यांची सावध प्रतिक्रिया

(India vs New Zealand: Deepak Chahar wins battle of ‘cold stares’ after Martin Guptill’s no-look six)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.