IndvsNz 2nd T20 : भारताचा न्यूझीलंडवर 7 विकेट्स राखून विजय

India vs New Zealand Live Streaming, 2nd T20 International Match: ऑकलंड: कर्णधार रोहित शर्माचं खणखणीत अर्धशतक आणि ऋषभ पंत-धोनीच्या फटकेबाजीनंतर भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडवर 7 विकेट्स राखून विजय मिळवला. रोहित शर्माने 29 चेंडूत 50 धावा ठोकल्या. यामध्ये त्याने 4 षटकार आणि 3 चौकार ठोकले. दुसऱ्या टी ट्वेण्टी सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला …

IndvsNz 2nd T20 : भारताचा न्यूझीलंडवर 7 विकेट्स राखून विजय

India vs New Zealand Live Streaming, 2nd T20 International Matchऑकलंड: कर्णधार रोहित शर्माचं खणखणीत अर्धशतक आणि ऋषभ पंत-धोनीच्या फटकेबाजीनंतर भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडवर 7 विकेट्स राखून विजय मिळवला. रोहित शर्माने 29 चेंडूत 50 धावा ठोकल्या. यामध्ये त्याने 4 षटकार आणि 3 चौकार ठोकले. दुसऱ्या टी ट्वेण्टी सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला भारताने 158 धावांत रोखलं. न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकात 8 बाद 158 धावा फटकावल्या. त्यामुळे भारताला या मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी 159 धावांची गरज होती. भारताने न्यूझीलंडचं हे आव्हान 18.5 षटकात 3 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं.

न्यूझीलंडचं 159 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा-शिखर धवन यांनी 79 धावांची दमदार सलामी दिली. कर्णधार रोहित शर्मा आक्रमक खेळीच्या इराद्यानेच मैदानात उतरला. त्याने चौकार ठोकून खातं उघडलं. रोहितने 28 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 50 धावा ठोकल्या. मात्र अर्धशतकानंतर तो लगेचच माघारी परतला. यानंतर मग धवनही बाद झाला. त्याने 31 चेंडूत 30 धावा केल्या. सलामीवीर मागे परतल्यानंतर ऋषभ पंत आणि विजय शंकर यांनी धुलाईला सुरुवात केली. विजय 8 चेंडूत 14 धावा करुन माघारी परतला. मग पंतच्या साथीला धोनी आला. या दोघांनीही धावांची गती कायम ठेवली. पंतने तर येईल तो चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केला.

ऋषभ पंतने 28 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 40 धावा केल्या. तर धोनीही 17 चेंडूत 20 धावा करुन नाबाद राहिला.

त्याआधी न्यूझीलंडच्या कूलीन डी ग्रॅण्डहोमच्या 50 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने 20 षटकात 8 बाद 158 धावा केल्या होत्या. भारताकडून कृणाल पंड्याने 4 षटकात 28 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आणि न्यूझीलंडला रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

मागच्या सामन्यात तुफानी खेळी करणाऱ्या सलामीवीर सैफर्ट आणि मुनरो यांना या सामन्यात वेसण घालण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. सैफर्टला भुवनेश्वरने 12 धावांवर तर मुनरोलाही 12 धावांवर कृणाल पंड्याने माघारी धाडलं. यानंतर डॅरिल मिचेलला (1) कृणाल पंड्याने पायचित करुन न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. तर कर्णधार विल्यमसनही कृणाल पंड्याचाच शिकार केला. विल्यमस 20 धावा करुन माघारी परतला. त्यावेळी न्यूझीलंडची स्थिती 4 बाद 50 अशी होती.

यानंतर रॉस टेलर आणि ग्रॅण्डहोमने फटकेबाजी करुन संघाची धावसंख्या शंभरच्या पार नेली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी रचली. फटकेबाजी करणाऱ्या ग्रॅण्डहोमला हार्दिक पंड्याने माघारी धाडलं. ग्रॅण्डहोमने 28 चेंडूत 50 धावा ठोकल्या. यांनतर मग रॉस टेलरला विजय शंकरने धावचित केलं. टेलरने 36 चेंडूत 42 धावा ठोकल्या. खलील अहमदने 7 धावांवर सँटनरच्या त्रिफळा उडवल्या. यानंतर खलील अहमदने शेवटच्या चेंडूवर साऊदीच्या त्रिफळा उडवून न्यूझीलंडला 20 षटकात 8 बाद 158 धावांत रोखलं

विजय आवश्यक

पहिल्या सामन्यातील पराभवामुळे भारताला बरोबरी साधण्यासाठी आज विजय आवश्यक होता. तीन सामन्यांच्या मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी रोहित ब्रिगेडला जिंकावंच लागणार होतं. तर केन विल्यमसनच्या न्यूझीलंडला आजचा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याची संधी होती.

कर्णधार रोहित शर्माने पहिल्या सामन्यात तीन अष्टपैलूंसह 8 फलंदाज मैदानात उतरवले होते. मात्र एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या यांना काहीच कमाल करता आली नाही. तर भारताची गोलंदाजीही निष्प्रभ ठरली. अनुभवी भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, हार्दिक पंड्या, विजय शंकर, कृणाल पंड्या आणि यजुवेंद्र चहलला किवी फलंदाजांनी अक्षरश: फोडून काढलं. त्याचा वचपा आज भारतीय संघाने काढला.

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पंड्या, मोहम्मद सिराज

न्यूझीलंड संघ: केन विल्यमसन (कर्णधार), डग ब्रेसवेल, कॉलिन डी ग्रँडहोम, लोकी फर्ग्युसन, स्कॉट कुगेलिन, कॉलिन मुनरो, डेरिल मिशेल, मिशेल सँटनर, टिम सेइफर्ट, इश सोढ़ी, टीम साऊदी, रॉस टेलर, ब्लेयर टिकनर, जेम्स नीशाम.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *