AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ ODI : ऋषभ पंतसोबतच टीम इंडियाच्या या ‘धुरंधरां’चाही पत्ता कट ! 2 स्टार खेळाडू वनडेतून OUT ?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 11 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी संघांची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र असं असलं तरी तीन मोठ्या खेळाडूंबाबत आधीच महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

IND vs NZ ODI : ऋषभ पंतसोबतच टीम इंडियाच्या या 'धुरंधरां'चाही पत्ता कट ! 2 स्टार खेळाडू वनडेतून OUT ?
कोणते स्टार खेळाडू वनडेतून बाहेर ? Image Credit source: social media
| Updated on: Dec 29, 2025 | 11:00 AM
Share

नव्या वर्षात टीम इंडियाचा (Team India) पहिलाच मुकाबला न्यूझीलंडशी (New Zealand) होणार आहे. 11 जानेवारी पासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय ( One Day serires) मालिकेला प्रारंभ होत असून, यासाठी अजूनतरी भारतीय संघाची अद्याप घोषणा झालेली नाही. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात टीम इंडियाचा एकदिवसीय संघ जाहीर होण्याची अपेक्षा आहे. पण त्याआधीच एक मोठी समोर आली आहे, ती म्हणजे टीम इंडियाच्या 3 खेळाडूंबद्दल. स्टार विकेटकीपर ऋषभ पंत याला बाहेर बसवण्याबद्दल अनेक अटकळू व्यक्त होत असतानाच आता अशी माहिती समोर येत्ये की आणखी 2 धुरंधरांनाही संघाबाहेर ठेवलं जाईल. ते खेळाडू म्हणजे हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह.

ODI सीरीज मधून बुमराह-पंड्याचा पत्ता कट ?

क्रिकबझमधील एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, 11 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान होणाऱ्या तीन वनडे सामन्यांसाठी बुमराह आणि पंड्या यांची निवड होणार नाही. दोघांनाही या मालिकेतून विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचे कारण म्हणजे आगामी टी-20 विश्वचषक 2026, जो 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि त्यात हे दोघेही टीम इंडियाचे सर्वात महत्त्वाचे खेळाडू असतील. 2024 मध्ये भारताला टी-20 विश्वचषक जिंकून देण्यात या दोघांनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्यांची मॅचविनिंग गोलंदाजी सर्वात खास होती.

जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या हे दोघेही टी-20 वर्ल्डकप टीमचा भाग आहेत, ज्याची घोषणा आधीच करण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेत खेळू शकले नाहीत, तरीही ते दोघे 21 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत पुनरागमन करतील. ही मालिका दोन्ही संघांसाठी आगामी वर्ल्डकपची तयारी ठरू शकते. या दोन्ही मालिका भारतात खेळल्या जातील.

विजय हजारे ट्रॉफी हार्दिकची एंट्री ?

दरम्यान, याच रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की वनडे टीममधून बाहेर राहिला तरी हार्दिक पंड्या देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धांमध्ये दिसेल. या काळात तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये बडोद्यासाठी किमान दोन सामने खेळू शकतो. बीसीसीआयने संघातील सर्व वरिष्ठ खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा आदेश दिला असून त्याच पार्श्वभूमीवर पंड्याही या ट्रॉफीत खेळू शकतो. मात्र स्टार वेगवान गोलंदाज बुमराहला यातून सूट देण्यात आली आहे.

ऋषभ पंतला सुट्टी ?

सिलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, टीम इंडियाची घोषणा 3 किंवा 4 जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, निवड समिती यावेळी ऑनलाइन बैठक घेईल आणि त्यावेळी एकदिवसीय मालिकेसाठी संघ निवडला जाईल. अलिकडच्याच एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ऋषभ पंतला वनडे टीममधून वगळले जाऊ शकते. त्याच्या जागी इशान किशन हा वनडे टीममध्ये परत येऊ शकतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये प्रभावी कामगिरी केल्यानंतर इशानची टी-20 विश्वचषकासाठी आधीच निवड झाली आहे. आता, विजय हजारे ट्रॉफीमध्ये 34 चेंडूत शतक झळकावल्यानंतर, तो एकदिवसीय संघातही परतण्याची शक्यता आहे.

पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.