India Vs NZ 3rd T20: आज होणार तिसरा सामना, विल्यमसन बाहेर, जाणून घ्या न्यूझिलंड टीममध्ये कोणाला मिळाली संधी
टिम साउदी याच्याकडे न्यूझिलंड टीमची जबाबदारी देण्यात आली आहे.

मुंबई : आज टीम इंडिया (India) आणि न्यूझिलंड (NZ) यांच्यात तिसरा (3rd) T20 सामना होणार आहे. पहिल्या सामन्याच्यावेळी मुसळधार पाऊस झाल्याने मॅच रद्द झाली होती. दुसरा T20 सामना टीम इंडियाने जिंकला आहे. आजच्या सामन्यात दोन्ही टीमसाठी विजय महत्त्वाचा आहे. न्यूझिलंडने आजचा सामना जिंकल्यास मालिकेत बरोबरी होईल. समजा टीम इंडियाने आजचा सामना जिंकल्यास, टीम इंडिया T20 मालिका जिंकेल. विशेष म्हणजे आजच्या महत्त्वाच्या सामन्यात न्यूझिलंड टीमचा विल्यमसन खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे.
टिम साउदी याच्याकडे न्यूझिलंड टीमची जबाबदारी देण्यात आली आहे. विल्यमसनच्या आरोग्याच्या काही चाचण्या करायच्या असल्यामुळे त्याला आजच्या सामन्यात सुट्टी देण्यात आली आहे. टिम साउदी नेतृत्वाच न्यूझिलंड टीम कशी कामगिरी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
नेपियरच्या मैदानात आजचा सामना होणार आहे. आजचा सामना दुपारी 12 वाजण्याता सुरु होणार आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज सुर्यकु्मार यादव सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
भारताचा संभाव्य संघ:
इशान किशन, ऋषभ पंत , सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पांड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल.
न्यूझीलंडचा संभाव्य संघ:
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे , मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, इश सोधी, अॅडम मिल्ने आणि लॉकी फर्ग्युसन.
