AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2022: भारत-पाक सामन्यात कोण मारणार बाजी; बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज

आशिया कप 2022 यावेळी टी-20 फॉरमॅटमध्ये खेळाला जात असल्याने त्याचबरोबर टी-20 मध्येही भारताचे पारडे पाकिस्तानवर जड तर आहेच त्याशिवाय या परिस्थितीत भारताची आशिया चषक जिंकण्याची शक्यताही जास्त आहे. त्यामुळे 28 ऑगस्ट रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील सामन्यात मोठी रंगत येणार आहे.

Asia Cup 2022: भारत-पाक सामन्यात कोण मारणार बाजी; बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Aug 27, 2022 | 12:40 PM
Share

नवी दिल्लीः आशिया चषक (Asia Cup 2022)  स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) या दोन्ही संघामध्ये 28 ऑगस्ट रोजी मोठा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार सराव करत असून एकीकडे विश्वचषक 2021 मध्ये भारतीय संघाला एकतर्फी सामन्यात पराभूत करणाऱ्या पाकिस्तानी संघाची मान उंचवली होती, त्यामुळे आता भारतीय संघही पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे जर आपण दोन्ही संघांच्या T20 च्या आकडेवारीवर नजर टाकली तर, दोन्ही संघांमध्ये T20 चे 9 सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने 7 सामने (Cricket Match) जिंकले आहेत आणि पाकिस्तान संघाने 2 सामन्यामध्ये विजय मिळवला होता. भारत आणि पाकिस्तानमधील आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तान भारतापेक्षा पुढे असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक, भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 200 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत.

त्यामध्ये पाकिस्तानने 87 सामने जिंकले आहेत, तर भारताने 71 सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे 42 सामने निकालाविना झाले आहेत. तर दुसरीकडे सर्व सामने स्वतंत्रपणे पाहिल्यास, भारत आणि पाकिस्तानमध्ये 132 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यामध्ये पाकिस्तानने 73 आणि भारताने 55 सामने जिंकले होते. वनडेमधील चार सामने निकालाशिवाय झाले असल्याचेही आपल्याला पाहायला मिळत आहे.

भारत आणि पाकिस्तान संघाचे सामना

दोन्ही संघ कसोटीत 59 वेळा आमने-सामने आले आहेत. यापैकी पाकिस्तानने 12 तर भारताने 9 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमध्ये कसोटीत 38 सामने झाले आहेत. मात्र, T20 मध्ये भारताचा वरचष्मा मात्र कायम राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत टी-20 चे 9 सामने झाले आहेत. जिथे भारताने 7 आणि पाकिस्तानने 2 सामने जिंकले आहेत.

भारतीय संघाला विजयाची अपेक्षा

आशिया कप 2022 यावेळी टी-20 फॉरमॅटमध्ये खेळाला जात असल्याने त्याचबरोबर टी-20 मध्येही भारताचे पारडे पाकिस्तानवर जड तर आहेच त्याशिवाय या परिस्थितीत भारताची आशिया चषक जिंकण्याची शक्यताही जास्त आहे. त्यामुळे 28 ऑगस्ट रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील सामन्यात मोठी रंगत येणार आहे.

भारत आणि पाकिस्तान सामना कधी?

आशिया कप 2022 मध्ये हा सामना रविवारी 28 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे.

सामना कुठे होणार?

यावेळी आशिया चषक यूएईमध्ये होत असून, भारत-पाकिस्तान सामना दुबई स्टेडियमवर होत आहे. श्रीलंका हा आशिया कपचा अधिकृत आयोजक असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Follow Us
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली