IndvsWI : रोहित शर्मा नवा विक्रम रचणार?

भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. फ्लोरिडातील सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल पार्क स्टेडियममध्ये रात्री 8 वाजता (India vs West Indies) या सामन्याला सुरुवात होईल.

IndvsWI : रोहित शर्मा नवा विक्रम रचणार?

फ्लोरिडा (अमेरिका) : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. फ्लोरिडातील सेंट्रल ब्रोवार्ड रिजनल पार्क स्टेडियममध्ये रात्री 8 वाजता (India vs West Indies) या सामन्याला सुरुवात होईल. विराट कोहलीची (Virat Kohli) टीम इंडिया (Team India) आज विजयी सलामी देण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. विश्वचषकातील पराभवानंतर भारताचा हा पहिलाच सामना आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी 20 विश्वचषकाची सुरुवात या दौऱ्यानिमित्त करण्यात येईल.

या दौऱ्यात भारत वेस्ट इंडिजविरुद्ध 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. पुढील वर्षीच्या ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वचषकाचा विचार करता निवड समितीने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. धोनीच्या जागी युवा खेळाडू रिषभ पंतला जागा देण्यात आली आहे.

रोहित शर्मा नवा विक्रम रचणार?

दरम्यान टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आज नवा विक्रम रचण्याच्या तयारीत आहे. टी 20 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम रोहितच्या नावावर होऊ शकतो. वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक 105 षटकार आहेत. गेलचा हा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्माला केवळ 4 षटकारांची गरज आहे. रोहितने 94 टी 20 सामन्यात 102 षटकार ठोकले आहेत.

भारतीय संघ (टी-20 मालिका)

 • विराट कोहली (कर्णधार)
 • रोहित शर्मा (उप-कर्णधार)
 • शिखर धवन
 • केएल राहुल
 • श्रेयस अय्यर
 • मनिष पांडे
 • रिषभ पंत (यष्टीरक्षक)
 • कृणाल पंड्या
 • रविंद्र जाडेजा
 • वॉशिंग्टन सुंदर
 • राहुल चहर
 • भुवनेश्वर कुमार
 • खलील अहमद
 • दीपक चहर
 • नवदीप सैनी

संबंधित बातम्या 

विंडीज दौऱ्यासाठी कोहली उपलब्ध, रोहितकडे कर्णधारपद जाण्याच्या भीतीने निर्णय? 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *