
Virat Kohli Instagram Account Reactivated: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. सांगायचं झालं तर, विराट कोहली अचानक सोशल मीडियावरून गायब झालेला. त्यांचं आ कोणाला दिसतंच नव्हतं… विराट कोहली याचं इन्स्टाग्राम अकाउंट दिसत नसल्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती आणि अनेक तर्क – वितर्क देखील लढवण्यात आलेय. सोशल मीडियावर विराट याचं अकाउंट दिसत नसल्यामुळे अनेक इन्स्टाग्रामवर विराट कोहली म्हणून सर्च केलं. पण त्यावर ‘User not found’ असं दिसू लागला… यामुळे चाहते आणि सोशल मीडियावर चर्चा रंगली की, विराट याने स्वतःच सोशल मीडिया अकाउंट बंद केलंय? एवढंच नाही तर, विराटचं अकाउंट डिलीट, हॅक की सस्पेंड झालं आहे? अशा देखील चर्चांनी जोर धरला.
विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर प्रचंड फॅन फॉलोइंग आहे, विराट याने इन्स्टाग्रामवर 27 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. अशात त्याचं अकाउंट अचानक गायब झाल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रश्न निर्माण झाले. विराट याचं अकाउंट दिसत नसल्यामुळे अनेकांनी पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या इन्स्टाग्राम पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये याबद्दल विचारणा केली आणि विचारलं ‘विराट कोहली कुठे आहे?’
पण काही तासांनंतर विराट कोहली याचा इन्स्टाग्राम अकाउंट पुन्हा Activate झाला. सोशल मीडियावर विराट याच्या पोस्ट दिसू लागल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी मोकळा श्वास घेतला. सध्या, या प्रकरणावर कोहली किंवा त्याच्या टीमकडून कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही. त्यामुळे, हे अकाउंट तांत्रिक कारणांमुळे निष्क्रिय करण्यात आलं होतं की, कोहलीचा स्वतःचा निर्णय होता हे स्पष्ट झालेलं नाही.
सांगायचं झालं तर, शुक्रवारी सकाळी कोहलीचा भाऊ विकास कोहली याचं देखील इंस्टाग्राम अकाउंट देखील शोधण्यात दिसणे बंद झालं. तेव्हा संबंधित प्रकरणाच्या चर्चांनी आणखी जोर धरला. त्याच्या प्रोफाइलमध्ये ‘Profile isn’t available’ असं देखील दिसून आलं. म्हणूनच चर्चांना अधिक उधाण आलं.
विराट कोहली याचं इन्स्टाग्राम अकाउंट Reactivated झालं असलेलं तरी, तो दुसऱ्या सोशल मीडियावर सक्रिय होता. विराट याचं एक्स म्हणून पूर्वी असलेल्या ट्विटरवर सक्रिय होता… यामुळे चाहत्यांमध्ये अटकळांना उधाण आलं. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर 37 वर्षीय कोहली अलीकडेच लंडनला परतला. तो आता आयपीएल 2026 मध्ये आरसीबी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) कडून खेळेल.