Suryakumar Yadav: या कारणामुळे निवड समितीने सूर्यकुमार यादव इतकी वर्षे वाया घालवली

| Updated on: Nov 22, 2022 | 10:08 AM

भारतीय निवड समितीने सूर्यकुमार यादवच्या कारकिर्दीची पाच वर्षे वाया घालवली, माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

Suryakumar Yadav: या कारणामुळे निवड समितीने सूर्यकुमार यादव इतकी वर्षे वाया घालवली
Suryakumar yadav
Image Credit source: bcci twitter
Follow us on

मुंबई : जगभरात क्रिकेटच्या दुनियेत सध्या फक्त एकचं नाव अधिक चर्चेत आहे. टीम इंडियाचा (Team India) स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवचं (Suryakumar Yadav) नाव प्रत्येक चाहत्याच्या तोंडी आहे. आशिया चषकापासून (Asia Cup 2022) तो अधिक चर्चेत आला. आशिया चषकात त्याने दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली. त्यानंतर विश्वचषक स्पर्धेत महत्त्वाच्या गोलंदाजांची त्याने चांगली धुलाई केली. त्याने अनेक सामने टीम इंडियाला मोठ्या फरकाने जिंकून दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक चाहत्याच्या तोंडी सूर्यकुमार यादवचं नावं आहे.

पाकिस्तानचा माजी गोलंदाज दानिश कनेरियाने टीम इंडियाच्या निवड समितीवरती मोठा आरोप केला आहे. सूर्यकुमार यादवची पाच वर्षे निवड समितीने वाया घालवली आहेत. प्रत्येकवेळी सुर्यकुमार यादवने चांगली खेळी केली आहे. परंतु निवड समितीने त्याला डावललं असा आरोप दानिश कनेरियाने केला आहे.

2020 मध्ये ज्यावेळी आयपीएल सुरु होतं. त्यावेळी सुर्यकुमार यादव फक्त आयपीएलच्या आठ मॅच खेळला होता. त्यावेळी त्याने आठ मॅचमध्ये 300 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. इतकी चांगली खेळी केल्यानंतर सुद्धा टीम इंडिच्या निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आयपीएल संपल्यानंतर लगेच ऑस्ट्रेलिया दौरा होणार होता, त्या दौऱ्यासाठी निवड न झाल्याने सूर्यकुमार यादव नाराज असल्याचं जाहीरपणे म्हणाला होता.

हे सुद्धा वाचा

भारताचा संभाव्य संघ:

इशान किशन, ऋषभ पंत , सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पांड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल.

न्यूझीलंडचा संभाव्य संघ:

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे , मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, इश सोधी, अॅडम मिल्ने आणि लॉकी फर्ग्युसन.