विराट कोहली रँकिंगमध्ये अव्वल, दुसऱ्या क्रमांकावर कोण?

सचिन पाटील

Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या ताज्या रँकिंगमध्ये आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोहली 934 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. दुसरीकडे टीम इंडियाचा युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनीही करियरमध्ये सर्वोत्तम रँकिंगची नोंद केली आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात 123 धावांची खेळी केली […]

विराट कोहली रँकिंगमध्ये अव्वल, दुसऱ्या क्रमांकावर कोण?

मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या ताज्या रँकिंगमध्ये आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोहली 934 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. दुसरीकडे टीम इंडियाचा युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनीही करियरमध्ये सर्वोत्तम रँकिंगची नोंद केली आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात 123 धावांची खेळी केली होती. या फलंदाजीमुळे त्याच्या खात्यात 14 गुण जमा झाल्याने तो 934 गुणांसह पहिल्या स्थानी आहे.

कसोटी फलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन दुसऱ्या स्थानावर आहे.

ICC रँकिंग: टॉप 10 कसोटी फलंदाज

 1. विराट कोहली (भारत) 934
 2. केन विल्यमसन (न्यूझीलंड) 915
 3. स्टीव स्मिथ (ऑस्ट्रेलिया) 892
 4. चेतेश्वर पुजारा (भारत) 816
 5. जो रूट (इंग्लंड) 807
 6. डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) 787
 7. दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका) 752
 8. डीन एल्गर (दक्षिण आफ्रीका) 724
 9. हेन्री निकोल्स (न्यूझीलंड) 708
 10. अजहर अली (पाकिस्तान) 708

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली कसोटी जिंकली, मात्र दुसऱ्या कसोटीत पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान ऋषभ पंतने 11 स्थानांनी झेप घेत 48 वं स्थान पटकावलं आहे. तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे दोन पायऱ्या चढून 15 व्या स्थानी पोहोचला आहे.

गोलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा पहिल्या स्थानावर आहे, तर भारताचा रवींद्र जाडेजा पाचव्या आणि आर अश्विन सहाव्या स्थानी आहेत.

ICC रँकिंग: टॉप 10 कसोटी गोलंदाज

 1. कॅगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) 882
 2. जेम्स अँडरसन (इंग्लंड) 874
 3. वरनॉन फिलेंडर (दक्षिण आफ्रिका)826
 4. मोहम्मद अब्बास (पाकिस्तान) 821
 5. रवींद्र जडेजा (भारत) 796
 6. रविचंद्रन अश्विन (भारत) 778
 7. नॅथन लियोन (ऑस्ट्रेलिया) 766
 8. पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) 761
 9. जोश हेजलवूड (ऑस्ट्रेलिया) 758
 10. यासिर शाह (पाकिस्तान) 757

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI