IPL 2020, CSK vs DC | IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला ‘हा’ विक्रम करण्याची संधी

टी- 20 क्रिकेटमध्ये धोनीला षटकाराचं त्रिशतक करण्याची संधी आहे. | ( Ipl 2020 Mahendra Singh Dhoni Record)

IPL 2020, CSK vs DC | IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला 'हा' विक्रम करण्याची संधी

दुबई : आयपीएलच्या (IPL 2020) 13 व्या मोसमातील 7 वा सामना आज (25 सप्टेंबर) खेळला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात हा सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला ( Mahendra Singh Dhoni ) एक विक्रम करण्याची संधी आहे. टी- 20 क्रिकेटमध्ये धोनीला षटकाराचं त्रिशतक करण्याची संधी आहे. धोनी या विक्रमापासून अवघे दोन सिक्स दूर आहे. (Ipl 2020 Mahendra Singh Dhoni Record)

काय आहे विक्रम ?

धोनीने आतापर्यंत टी- 20 क्रिकेटमध्ये एकूण 298 सिक्स लगावले आहेत. धोनीने राजस्थान रॉयल्सविरुद्धात झालेल्या सामन्यात एकूण 3 सिक्स लगावले होते. या तीन षटकारांसह धोनीच्या नावावर 298 सिक्सची नोंद झाली.त्यामुळे धोनीने आज दिल्लीविरुद्धात आणखी 2 सिक्स लगावले तर षटकारांचं त्रिशतक पूर्ण होईल.

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत हिटॅमन रोहित शर्माचा (Rohit Sharma) पहिला क्रमांक लागतो. रोहित शर्माने आतापर्यंत एकूण 361 सिक्स लगावले आहेत. तर याबाबतीत दुसरा क्रमांक ‘मिस्टर आयपीएल’ असलेल्या सुरेश रैनाचा (Suresh Raina) लागतो. सुरेश रैनाच्या नावावर 311 सिक्सची नोंद आहे. रैनाने वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमातून माघार घेतली आहे.

गब्बर शिखर धवनला (Shikhar Dhawan) 100 सिक्ससाठी 4 सिक्सची गरज आहे. धवनने टी-20 मध्ये 96 सिक्स लगावले आहेत. तर ऋषभ पंतलाही (Rushabh Pant) 100 षटकार ठोकण्याची संधी आहे. यासाठी त्याला 6 सिक्सची गरज आहे. पंतने आतापर्यंत टी – 20 कारकिर्दीत 94 सिक्स लगावलेत.

फॅफ डु प्लेसी आणि रवींद्र जडेजा

धोनीशिवाय चेन्नईच्या फॅफ डु प्लेसिस (Faf Du Plesis)आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) या दोघांना आयपीएलमध्ये 2 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. फॅफला 2 हजार धावांसाठी अवघ्या 17 धावांची गरज आहे. तर जडेजाला यासाठी 62 धावांची आवश्यकता आहे.

चेन्नई दिल्लीवर भारी

चेन्नई विरुद्ध दिल्ली यांच्यात आतापर्यंत एकूण 21 सामने खेळण्यात आले आहेत. यामध्ये चेन्नई दिल्लीवर वरचढ राहिली आहे. चेन्नईने या 21 पैकी 15 सामने जिंकले आहेत. तर दिल्लीला 6 सामने जिंकण्यास यश आले आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, KKR vs MI | आयपीएल कारकिर्दीत हिटमॅन रोहित शर्माचं षटकारांचं द्विशतक

(Ipl 2020 Mahendra Singh Dhoni Record)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI