IPL 2020, KKR vs MI | आयपीएल कारकिर्दीत हिटमॅन रोहित शर्माचं षटकारांचं द्विशतक

आयपीएलमध्ये 200 सिक्स लगावण्याचा विक्रम रोहितने आपल्या नावे केला आहे. | (Hitman Rohit Sharma 2OO Six In IPL)

IPL 2020, KKR vs MI | आयपीएल कारकिर्दीत हिटमॅन रोहित शर्माचं षटकारांचं द्विशतक
Follow us
| Updated on: Sep 24, 2020 | 2:08 PM

अबुधाबी : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) बुधवारी 23 सप्टेंबरला दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) 49 धावांनी पराभव केला. यासह मुंबईचा या मोसमातील पहिला विजय ठरला. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. रोहितने 80 धावांची खेळी केली. यात रोहितने 6 सिक्स आणि 3 फोर लगावले. या खेळीसह रोहितने रेकॉर्ड केला आहे. आयपीएलमध्ये 200 सिक्स लगावण्याचा विक्रम रोहितने आपल्या नावे केला आहे. याबाबत मुंबई इंडियन्सने ट्विट केले आहे. (Hitman Rohit Sharma 200 Six )

रोहितने सामन्याच्या 14 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर सिक्स ठोकत आयपीएल कारकिर्दीतील 200 सिक्स पूर्ण केले. रोहितने कुलदीप यादवच्या बोलिंगवर 200 वा सिक्स लगावला. आयपीएल स्पर्धेत रोहित शर्मा हा 200 सिक्सचा टप्पा गाठणारा चौथा खेळाडू ठरला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सचा विक्रम ”यूनिवर्सल बॉस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलच्या (Chris Gayle) नावावर आहे. गेलच्या नावावर सर्वाधिक म्हणजे 326 सिक्सची नोंद आहे. तर या पाठोपाठ बंगळुरुच्या एबी डीव्हिलियर्सचा (AB de Villiers) दुसरा क्रमांक लागतो. डीव्हिलियर्सच्या नावे 214 सिक्सची नोंद आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर महेंद्रसिंह धोनी  (Mahendra Singh Dhoni) आहे. धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 212 सिक्स ठोकले आहेत. तर 200 सिक्सचा टप्पा गाठत रोहित चौथा खेळाडू ठरला आहे.

हिटमॅनचा असाही विक्रम

कोलकाता विरुद्ध केलेल्या 80 धावांच्या खेळीसाठी रोहितला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. यासोबतच रोहित आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. रोहितने मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवण्याची ही 18 वी वेळ ठरली.

मुंबईचा यूएईमधईल पहिला विजय

कोलकाता विरुद्धातील सामना जिंकत मुंबईने यूएईत पहिला सामना जिंकला. यूएईत सलग सहाव्या पराभवानंतर मुंबईला सातव्या सामन्यात विजय मिळवण्यास यश आले. याआधी चेन्नईविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाला होता. तर 2014 ला यूएईमध्ये मुंबईने 5 सामने खेळले होते. या पाचही सामन्यात मुंबईचा पराभव झाला होता.

संबंधित बातम्या :

IPL 2020 | जसप्रीत बुमराहमुळे लसिथ मलिंगाची कमतरता भासणार नाही : ब्रेट ली

ICC ODI ranking | आयसीसी क्रमवारीत ‘विराट’ स्थान अबाधित, रोहित शर्माचा कितवा नंबर?

( Hitman Rohit Sharma 2OO Six In IPL )

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.