AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 : विराट कोहली ICC चे नियम विसरला, मागितली पंचांची माफी

आयपीएलमध्ये काल खेळवण्यात आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीकडून एक मोठी चूक होणार होती.

IPL 2020 : विराट कोहली ICC चे नियम विसरला, मागितली पंचांची माफी
| Updated on: Oct 06, 2020 | 8:43 AM
Share

दुबई : खेळाडू कितीही मोठा असला तरी खेळ मात्र त्याच्यापेक्षा मोठा असतो. त्यामुळे खेळाडूच्या कोणत्याही चुकीकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. आयपीएलमध्ये काल (सोमवारी) खेळवण्यात आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीकडून (Virat Kohli) एक मोठी चूक होणार होती. परंतु तो थोडक्यात बचावला. विराटने ती चूक केली असती तर त्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागली असती. कदाचित आरसीबीच्या संघालाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असता. (Virat Kohli step out at last moment from applying salaiva on ball)

करोनानंतर जगभरात लोकांचे राहणीमान, घराबाहेर कसं वावरायचं याचे काही नियम ठरले आहेत. क्रिकेटमध्येही काही नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास खेळाडूला मोठी शिक्षा होऊ शकते. दिल्लीविरुद्धच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना कोहलीकडे एकदा चेंडू आला होता. कोहलीने यावेळी चेंडूला थुंकी लावण्याचा प्रयत्न केला. त्याने एकदा चेंडूला तसा हात लावलादेखील, पण त्यानंतर त्याच्या हा नवा नियम लक्षात आला. आपल्याकडून चूक झाल्याचे त्याच्या लक्षात आल्यावर कोहलीने पंचांची माफीदेखील मागितल्याचे पाहायला मिळाले.

काय आहे नवीन नियम?

चेंडू चमकवण्यासाठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे खेळाडू त्यावर थुंकी/लाळ लावतात. परंतु आयसीसीच्या नव्या नियमानुसार कोणत्याही खेळाडूला तसे करता येणार नाही. कारण चेंडूला थुंकी किंवा लाळ लावल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे आयसीसीने या गोष्टीस मनाई केली आहे. खेळाडूंनी चेंडूला थुंकी लावली तर पंचांकडून खेळाडूला दोन वेळा इशारा दिला जाईल. तरिही खेळाडूने नियमांचे उल्लंघन केले तर जो संघ फलंदाजी करत असेल त्या संघाला पाच धावांची पेनल्टी म्हणजे त्या संघाच्या धावांमध्ये पाच धावा आणखी जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे विराटची ही चूक संपूर्ण आरसीबीच्या संघाला भोगावी लागली असती.

उथप्पा आणि अमित मिश्राकडूनही तीच चूक

दरम्यान मागील आठवड्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रॉबिन उथप्पाने आयसीसीच्या या नियमाचे उल्लंघन केले होते. राजस्थानचा संघ क्षेत्ररक्षण करत असताना उथप्पाने चेंडू चमकण्यासाठी थुंकीचा वापर केला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसेच सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करत असताना दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्रानेदेखील चेंडूवर थुंकी लावून चेंडू चमकावण्याचा प्रयत्न केला होता.

संबंधित बातम्या

IPL 2020, RCB vs DC : विराटची ‘विराट’ कामगिरी, ठरला पहिला भारतीय फलंदाज

IPL 2020 : धोनीने ठोकलं शतक, ‘असा’ विक्रम करणारा दुसरा खेळाडू

वय हे काहींसाठी संघाबाहेर काढण्यासाठीचं कारण, इरफान पठाणचा धोनीवर अप्रत्यक्ष हल्ला

(Virat Kohli step out at last moment from applying salaiva on ball)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.