AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वय हे काहींसाठी संघाबाहेर काढण्यासाठीचं कारण, इरफान पठाणचा धोनीवर अप्रत्यक्ष हल्ला

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी शुक्रवारी झालेल्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात एक-एक धाव मिळवण्यासाठी संघर्ष करताना पाहायला मिळाला. त्यावरुन इरफान पठाणने धोनीला लक्ष्य केले आहे.

वय हे काहींसाठी संघाबाहेर काढण्यासाठीचं कारण, इरफान पठाणचा धोनीवर अप्रत्यक्ष हल्ला
| Updated on: Oct 03, 2020 | 3:10 PM
Share

मुंबई : चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी काल (शुक्रवार) झालेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्धच्या सामन्यात एक-एक धाव मिळवण्यासाठी संघर्ष करताना पाहायला मिळाला. अनेक लोक धोनीला सर्वात फिट क्रिकेटर मानतात, मात्र कालच्या सामन्यात धोनीला स्ट्राईक रोटेट करताना पण अडचणी येत होत्या. यादरम्यान दमलेल्या धोनीने अनेक ब्रेकसुद्धा घेतले. (Irfan Pathan indirectly slams MS Dhoni on twitter)

सामना संपल्यानंतर धोनी म्हणाला की बॉल त्याच्या बॅटच्या मधोमध येत नव्हता. धोनीने 36 चेंडूत 47 धावा जरूर काढल्या परंतु त्या धावा करताना धोनीची खूपच दमछाक झालेली पाहायला मिळाले. परिणामी धोनीसारखा बेस्ट मॅच फिनिशर मैदानात असूनही चेन्नईच्या संघाला 165 धावांचं लक्ष्य पार करता आलं नाही.

दरम्यान, टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने एक ट्वीट करुन नाव न घेता महेंद्रसिंह धोनीवर निशाणा साधला आहे. इरफानने ट्वीट केलं आहे की, ‘कुछ लोगों के लिए उम्र सिर्फ एक आंकड़ा है और बाकियों को टीम से बाहर करने की वजह…’ (काही लोकांसाठी वय हा केवळ एक नंबर असतो, तर काहींसाठी संघाबाहेर काढण्यासाठीचं कारण.)

इरफानच्या ट्वीटमध्ये धोनीचं नाव घेतलेलं नाही. परंतु एकंदरीत कालच्या सामन्याची पार्श्वभूमी पाहता इरफानने धोनीला टार्गेट केल्याचं बोललं जात आहे. तशा कमेंट्सही इरफानच्या ट्वीटवर पाहायला मिळत आहेत. काहींनी इरफानचं समर्थन केलं आहे. तर धोनीच्या चाहत्यांनी धोनीची बाजू मांडली आहे.

सामना संपल्यानंतर धोनी म्हणाला की, वातावरण फार चांगलं नाही. त्यामुळे मला खेळताना अडचणी येत होत्या. फार चिंता करण्याची गरज नाही. परंतु अशा प्रकारच्या वातावरणात गळा सुखतो. दरम्यान सोशल मीडियावर लोकांनी धोनीच्या फिटनेसवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जुलै 2019 नंतर धोनी पहिलीच स्पर्धा खेळत आहे.

इरफानने धोनीच्या नेतृत्वात भारताला 2007 चा टी-20 वर्ल्डकप आणि 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देण्यात मोलाची भूमिका निभावली आहे. धोनीच्या नेतृत्वात इरफान भारतासाठी अनेक सामने खेळला आहे. तसेच धोनीच्याच नेतृत्वात इरफानने आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स आणि रायजिंग पुणे सुपरजाईंट्स या संघांचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

इरफानची 35 व्या वर्षी निवृत्ती

इरफान पठाणचं वय 35 वर्ष आहे, तर धोनीचं वय 39 वर्ष इतकं आहे. इरफानने जानेवारी 2020 मध्ये निवृत्तीची घोषणा केली.तर धोनी 15 ऑगस्ट 2020 रोजी वयाच्या 39 व्या वर्षी निवृत्त झाला आहे. निवृत्तीपूर्वी बराच काळ इरफान पठाण टीमपासून लांब राहिला. त्याने टीममध्ये परतण्यासाठी प्रयत्न केले. परंतु तो अपयशी ठरला.

जुना धोनी हरवलाय?

हैदराबादविरोधातील सामन्यात धोनी नाबाद राहिला खरा, मात्र चेन्नईची टीम 7 धावांनी पराभूत झाली. आयपीएलच्या सीजन-13 मध्ये हे दुसऱ्यांदा घडलंय की महेंद्र सिंह धोनी नाबाद, मात्र टीम पराभूत झाली आहे. तर आतापर्यंत सर्व लीगमध्ये असं सहा वेळा घडलं आहे, जेव्हा धोनी नाबाद राहिला आहे, मात्र संघ पराभूत झाला आहे. विकेट किंपिंगमध्ये धोनीला तोड नाही. मात्र फलंजादीसाठी मैदानावर उतरल्यावर जुना महेंद्र सिंह धोनी पाहायला मिळत नाही.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.