IPL 2020, DC vs CSK | दिल्लीच्या डोकेदुखीत वाढ, मोठ्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यर मुकण्याची चिन्हं

| Updated on: Oct 17, 2020 | 5:56 PM

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या यंदाच्या 13 व्या मोसमात दमदार कामिगरी केली आहे.

IPL 2020, DC vs CSK | दिल्लीच्या डोकेदुखीत वाढ, मोठ्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यर मुकण्याची चिन्हं
Follow us on

शारजा : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 34 वा सामना दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals)विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जस (Chennai Super Kings) यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याआधी दिल्लीच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीचा संघ चिंतेत आहे. ipl 2020 delhi capitals captain shreyas iyer uncertain about playing against chennai super kings

श्रेयस अय्यरला राजस्थान रॉयल्सविरुद्ध बुधवारी 14 ऑक्टोबरच्या सामन्यात फिल्डिंगदरम्यान डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे अय्यरला ड्रेसिंगरुममध्ये परतावे लागले होते. यानंतर या सामन्यात शिखर धवनने संघाचे नेतृत्व केलं होतं. तसेच आक्रमक फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंतलाही दुखापतीमुळे आणखी काही सामन्यांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे दिल्लीचा चेन्नईविरुद्धच्या सामन्यात कस लागणार आहे.

नेतृत्व कोण करणार?

जर चेन्नईविरुद्धच्या सामन्यात श्रेयसला खेळता आले नाही, तर गब्बर शिखर धवन दिल्लीचे नेतृत्व करु शकतो. पण अय्यरच्या जागेवर दिल्ली कोणाला स्थान देणार याकडे दिल्लीच्या चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

दिल्लीला दुखापतीचं ग्रहण

दिल्ली कॅपिटल्सच्या मागे लागलेलं दुखापतीचं ग्रहण क्षमण्याचं नाव घेत नाहीये. दुखापतीमुळे अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राला आयपीएलच्या या मोसमातून माघार घ्यावी लागली. मिश्राच्या हाताच्या बोटाला कॅच घेताना दुखापत झाली होती. त्यानंतर वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या बरगड्यांना झालेल्या दुखापतीमुळे या आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. त्यामुळे दिल्लीचा संघ अडचणीत सापडला आहे.

दिल्लीने यंदाच्या मोसमात दमदार कामिगरी केली आहे. दिल्लीने आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले आहेत. यापैकी दिल्लीने 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तर उर्वरित 2 सामन्यात दिल्लीचा पराभव झाला आहे. दिल्ली पॉइंट्सटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान आज संध्याकाळी (17 ऑक्टोबर) डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्याला म्हणजेच दिल्ली विरुद्ध चेन्नई सामन्याला 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, RR vs RCB Live : बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी 178 धावांचे आव्हान

IPL 2020, DC vs CSK Live : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जस आमनेसामने

ipl 2020 delhi capitals captain shreyas iyer uncertain about playing against chennai super kings