AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 : फ्रँचायझींनी तब्बल 11 कोटी मोजले, मात्र स्फोटक फलंदाजाकडून निराशा, 9 सामन्यात केवळ 58 धावा

धडाकेबाज फलंदाजाने आयपीएलच्या 13 व्या मोसमात निराशाजनक कामगिरी केली आहे.

IPL 2020 : फ्रँचायझींनी तब्बल 11 कोटी मोजले, मात्र स्फोटक फलंदाजाकडून निराशा, 9 सामन्यात केवळ 58 धावा
| Updated on: Oct 20, 2020 | 7:26 PM
Share

दुबई : आयपीएल (IPL 2020 ) स्पर्धा म्हणजे फटकेबाजी, लांबच लांब सिक्सर, थरार आणि रोमांच. या स्पर्धेत अनेक खेळाडूंकडून फटकेबाजी पाहायला मिळते. यंदाच्या 13 व्या मोसमातही आतापर्यंत अशीच फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. किंग्जस इलेव्हन पंजाबच्या फ्रँचायझीने मोठी रक्कम मोजून ग्लेन मॅक्सवेल या हार्ड हीटर फलंदाजाचा आपल्या गोटात समावेश केला. मात्र त्याला आपल्या संघासाठी पैसा वसूल कामगिरी करता आलेली नाही. IPL 2020 KXIP Glenn Maxwelll Bad Performance

किंग्जस इलेव्हन पंजाबने 2 सामन्यात सलग विजय मिळवत स्पर्धेत पुनरागमन केलं. मात्र आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला सूर गवसलेला नाही. मॅक्सवेलसाठी पंजाबच्या फ्रँचायझीने 10 कोटी 75 लाख रुपये मोजले आहेत. मात्र मॅक्सवेलला त्या मोबदल्यात पैसावसूल कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे मॅक्सवेलचा आता फ्लॉप फलंदाजांच्या यादीत समावेश झाला आहे. मॅक्सवेलने यंदाच्या मोसमात आतापर्यंत 9 सामने खेळले आहे. या 9 सामन्यातून 8 डावात त्याने बॅटिंग केली आहे. यामध्ये त्याने केवळ 58 धावाच केल्या आहेत. मॅक्सवेलची यंदाच्या मोसमातील नाबाद 13 सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. विशेष म्हणजे मॅक्सवेलला या 8 डावात एकही सिक्स लगावता आला नाही. यावरुन मॅक्सवेलच्या सुमार खेळीचा अंदाज येतो.

ग्रॅमी स्वान हैराण

निराशाजनक कामिगिरीनंतरही ग्लेन मॅक्सवेलला पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वारंवार स्थान दिले जात आहे. यावरुन इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅमी स्वान याने काही दिवसांपूर्वी हैराणी व्यक्त केली होती. “मॅक्सवेल हा स्टार खेळाडू आहे. मॅक्सवेलसाठी पंजाबने मोठी रक्कम मोजली आहे. मात्र त्यानुसार त्याला कामगिरी करता आली नाही. मॅक्सवेलने इंग्लंडविरुद्ध दमदार कामगिरी केली होती. तशीच कामगिरी त्याने आयपीएलमध्ये करावी”, असं स्वान काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात म्हणाला होता.

मॅक्सवेलची आयपीएल कारकिर्द

मॅक्सवेलने आतापर्यंत आयपीएलमध्ये 78 सामने खेळले आहेत. या 78 सामन्यात त्याने 156 च्या स्ट्राईक रेटने 1 हजार 455 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 अर्धशतकांचा समावेश आहे. 95 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. मॅक्सवेलने पंजाबसाठी 2014 मध्ये तडाखेदार खेळी केली होती. मॅक्सवेलने तेव्हा 187 च्या स्ट्राईक रेटने 16 सामन्यात 552 धावा केल्या होत्या.

पंजाबने यंदाच्या मोसमात आतापर्यंत एकूण 9 सामने खेळले आहेत. या 9 सामन्यांपैकी केवळ 3 सामन्यात पंजाबला विजय मिळवता आला आहे. दरम्यान पंजाब आज (20 ऑक्टोबर) दिल्लीविरुद्ध भिडणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीतले आव्हान कायम राखण्यासाठी पंजाबसाठी विजय मिळवणे अत्यावश्यक असणार आहे.

संबंधित बातम्या :

PHOTO | निराशाजनक कामगिरीनंतरही मॅक्सवेलला संधी, इंग्लंडचा माजी खेळाडू हैराण

IPL 2020 KXIP Glenn Maxwelll Bad Performance

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.