AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020, MI vs KKR : क्विटंन डी कॉकची धमाकेदार खेळी, मुंबईची कोलकातावर 8 विकेट्सने मात

नाबाद 78 धावा करणारा क्विंटन डी कॉक ठरला 'मॅन ऑफ द मॅच'

IPL 2020, MI vs KKR : क्विटंन डी कॉकची धमाकेदार खेळी, मुंबईची कोलकातावर 8 विकेट्सने मात
| Updated on: Oct 16, 2020 | 11:31 PM
Share

अबुधाबी : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 8 विकेटने मात केली आहे. कोलकाताने मुंबईला विजयासाठी 149 धावांचे आव्हान दिले होते. मुंबईने हे विजयी आव्हान 2 विकेट गमावून 16.5 ओव्हरमध्येच पूर्ण केले. मुंबईने 149 धावा केल्या. या विजयासह मुंबईचा हा सलग 5 वा विजय ठरला. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक नाबाद 78 धावा केल्या. तर कर्णधार रोहितने 35 धावा केल्या. कोलकाताकडून वरुण चक्रवर्थी आणि शिवम वामीने प्रत्येकी 1 विकेट घेतली. (Mumbai Indians Beat Kolkata Knight Riders By 8 Wickets )

विजयी आव्हानासाठी मैदानात आलेल्या मुंबईची धमाकेदार सुरुवात झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक या जोडीने मुंबईला चांगली सुरुवात दिली. या जोडीने 94 धावांची सलामी भागीदारी केली. यादरम्यान क्विटंन डी कॉकने आपले अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर रोहित शर्मा 35 धावांवर कॅचआऊट झाला. रोहितने या खेळीत 5 फोर आणि 1 सिक्स लगावला. रोहितनंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. पण आज सूर्यकुमारला विशेष काही करता आले नाही. सूर्यकुमार 10 धावांवर असताना स्वीप शॉट मारण्याच्या नादात बोल्ड झाला.

यानंतर हार्दिक पांड्याला बॅटिंगसाठी चौथ्या क्रमांकावर पाठवलं. हार्दिक पांड्या आणि क्विंटन डी कॉक या जोडीने मुंबईला विजय मिळवून दिला. क्विंटन डी कॉकने नाबाद 78 धावांची खेळी केली. यात त्याने 3 सिक्स आणि 9 फोर लगावले. तर हार्दिक पांड्याने नाबाद 21 धावा केल्या. याखेळीत हार्दिकने 1 सिक्स आणि 3 फोर ठोकले.

त्याआधी कोलकाताने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या कोलकाताची सावध सुरुवात राहिली. मात्र यानंतर कोलकाताने ठराविक अंतराने विकेट्स गमावले. कोलकाताची पहिली विकेट 18 धावावंर गेली. पॉइंटवर असलेल्या सूर्यकुमार यादवने राहुल त्रिपाठीचा भन्नाट कॅच घेतला. यानंतर कोलकाताचा 33 स्कोअर असताना दुसरा झटका लागला. नितीश राणा 5 धावांवर बाद झाला. यानंतर राहुल चहरने 8 व्या ओव्हरमधील चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर शुभमन गिल आणि दिनेश कार्तिकला बाद केले. यानंतर काही ओव्हरनंतर आक्रमक फलंदाज आंद्रे रसेलही बाद झाला. त्यामुळे कोलकाताची परिस्थिती 61-5 अशी झाली.

कोलकाता संकटात असताना कर्णधार इयॉन मॉर्गन आणि पॅट कमिन्स या जोडीने कोलकाताचा डाव सावरला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 87 धावांची नाबाद भागीदारी केली. या दरम्यान पॅटने आपले अर्धशतक पूर्ण केले. पॅटने नाबाद 53 धावा केल्या. यात त्याने 2 सिक्स आणि 5 फोर लगावले. तर इयॉन मॉर्गननेही नाबाद 39 धावा केल्या. कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 148 धावा केल्या. मुंबईकडून राहुल चहरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट, नॅथन कुल्टर नाईल आणि जसप्रीत बुमराने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

[svt-event title=”मुंबईची कोलाकातावर 8 विकेट्सने मात” date=”16/10/2020,10:51PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 6 ओव्हरमध्ये 36 धावांची आवश्यकता” date=”16/10/2020,10:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]ी

[svt-event title=”मुंबईला दुसरा धक्का” date=”16/10/2020,10:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला पहिला धक्का” date=”16/10/2020,10:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईचा 10 ओव्हरनंतर स्कोअर” date=”16/10/2020,10:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”क्विंटनचे दणदणीत अर्धशतक” date=”16/10/2020,10:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई पावरप्लेनंतर” date=”16/10/2020,9:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईची शानदार सुरुवात” date=”16/10/2020,9:52PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईची सावध सुरुवात” date=”16/10/2020,9:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात” date=”16/10/2020,9:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईला विजयासाठी 149 धावांचे आव्हान” date=”16/10/2020,9:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पॅट कमिन्सचे अर्धशतक” date=”16/10/2020,9:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सहाव्या विकेटसाठी पॅट कमिन्स-इयोन मॉर्गन जोडीची अर्धशतकी भागीदारी” date=”16/10/2020,8:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाता 17 ओव्हरनंतर” date=”16/10/2020,8:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाता अडचणीत ” date=”16/10/2020,8:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आंद्रे रसेल आऊट ” date=”16/10/2020,8:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाता 8 ओव्हरनंतर” date=”16/10/2020,8:15PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राहुल चहरचा दणका, कोलकाताचे 2 चेंडूत झटकले 2 विकेट” date=”16/10/2020,8:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला चौथा झटका” date=”16/10/2020,8:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला तिसरा झटका” date=”16/10/2020,8:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पावरप्लेच्या 6 ओव्हरनंतर कोलकाता” date=”16/10/2020,8:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला दुसरा झटका” date=”16/10/2020,7:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताला पहिला धक्का” date=”16/10/2020,7:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाता 2 ओव्हरनंतर” date=”16/10/2020,7:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात” date=”16/10/2020,7:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू” date=”16/10/2020,7:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाता प्लेइंग इलेव्हन” date=”16/10/2020,7:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईचे अंतिम 11 खेळाडू” date=”16/10/2020,7:32PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोलकाताने टॉस जिंकला” date=”16/10/2020,7:31PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

नेतृत्वाची जबाबदारी मॉर्गनकडे

दिनेश कार्तिक कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाला आहे. फलंदाजीत सुधार करण्यासाठी तसेच संघासाठी आणखी चांगले योगदान देण्याच्या उद्देशाने कार्तिकने नेतृत्वपदाची जबाबदारी इयन मॉर्गनकडे सोपवली आहे. त्यामुळे आजपासून पुढील सर्व सामन्यात कोलकाताचे नेतृत्व इयोन मॉर्गन करणार आहे.

मुंबई कोलकातावर भारी

विजयाच्या बाबतीत मुंबई कोलकाताला वरचढ ठरली आहे. आतापर्यंत मुंबई कोलकाता यांच्यात एकूण 26 सामने खेळण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईने कोलकाताचा 20 वेळा पराभव केला आहे. तर कोलकाताला अवघ्या 6 सामन्यात विजय मिळवता आला आहे.  मुंबई पॉइंट्सटेबलमध्ये 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर कोलतकाता 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. आजच्या सामन्यातील विजय दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. त्यामुळे हा सामना नक्की कोणता संघ जिंकणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पेटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरोन पोलार्ड, कृणाल पांड्या, मिचेल मॅक्लेनघन, मोहसिन खान, नॅथन कूल्टर नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव आणि ट्रेन्ट बोल्ट.

कोलकाता नाईट रायडर्स : शुभमन गिल, सुनील नारायण, इयन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, नितीश राणा, आंद्रे रसेल, निखिल नायक, पॅट कमिन्स, शिवम मावी, कुलदीप यादव, संदीप वारियर, प्रसिद्ध क्रिष्णा, कमलेश नागरकोटी

संबंधित बातम्या :

KKR vs MI, IPL 2020 | रोहितचा धमाका, मुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर 49 धावांनी विजय

IPL 2020 | दिनेश कार्तिकने KKR चे कर्णधारपद सोडलं, कर्णधारपदाची धुरा ‘या’ खेळाडूकडे

ipl 2020 mi vs kkr live score update today cricket match mumbai indians vs kolkata knight riders

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.