IPL 2020 | वयाच्या 19 वर्षी क्रिकेटमध्ये पर्दापण, भुवनेश्वरच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी

भुवनेश्वर कुमारला दुखापतीमुळे यंदा आयपीएलच्या मोसमाला मुकावे लागले. (Bhuvneshwar Kumar's replacement pacer Prithvi Raj Yaara)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:10 PM, 6 Oct 2020
IPL 2020 | वयाच्या 19 वर्षी क्रिकेटमध्ये पर्दापण, भुवनेश्वरच्या जागी 'या' खेळाडूला संधी

दुबई : सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) दुखापतीमुळे यंदा आयपीएलच्या मोसमाला मुकावे लागले आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वरला ही दुखापत झाली होती. यामुळे हैदराबादसाठी हा मोठा धक्का आहे. दरम्यान आता हैदराबादमध्ये भुवनेश्वर कुमारच्या जागेवर 22 वर्षीय पृथ्वी राज यारा (Prithvi Raj Yara) या युवा गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे. (Bhuvneshwar Kumar’s replacement pacer Prithvi Raj Yaara)

कोण आहे पृथ्वी?

पृथ्वी हा आंध्रप्रदेशचा (Andhara Pradesh) डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. पृथ्वीने डोमेस्टिक (Domestic Cricket) क्रिकेटमध्ये वयाच्या 19 व्या वर्षी पदार्पण केलं. पृथ्वी दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करतो. पृथ्वी आयपीएलच्या (IPL 2019) 12 व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्ससाठी (Kolkata Knight Riders) खेळला होता. विशेष म्हणजे त्याने आयपीएलमधील पर्दापण सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध केलं होतं. पृथ्वी हा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बोलर आहे. टी 20 क्रिकेटमध्ये डेथ ओव्हरला फार महत्तव असतं. या शेवटच्या काही षटकांमध्ये सामना कोणत्याही संघाच्या बाजून झुकतो. त्यामुळे पृथ्वी आता कशाप्रकारे कामगिरी करतो, याकडे हैदराबादच्या समर्थकांचं लक्ष असणार आहे.

हैदराबादचा स्टार बोलर भुवनेश्वर

भुवनेश्वर कुमार हैदराबादचा स्टार आणि प्रमुख बोलर होता. भुवनेश्वरने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 4 सामने खेळले. यात त्याने 6.98 च्या इकॉनॉमी रेटने 3 विकेट्स घेतले होते. विकेट्स घेण्यासोबतच भुवनेश्वर धावगतीवर ब्रेक लावायचा. त्यामुळे विरोधी संघातील फलंदाजांवर दबाव निर्माण व्हायचा. परिणामी विकेट्स मिळायच्या. त्यामुळे भुवनेश्वरची संघातील उपस्थिती किती महत्वाची होती, हे यावरुन सिद्ध होते.

टीम इंडियासाठीही मोठा धक्का ?

आयपीएल स्पर्धेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया (India Tour Australia) दौऱ्यावर जाणार आहे. भुवनेश्वर कुमारला दुखापतीमुळे या दौऱ्याला मुकण्याची शक्यता आहे. भुवनेश्वरला फीट होण्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो. त्यामुळे हैदराबादसह टीम इंडियासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

अमित मिश्रा स्पर्धेबाहेर

दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राला (Amit Mishra) आयपीएलच्या या मोसमाला मुकावे लागले आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 3 ऑक्टोबरला सामना खेळण्यात आला. या सामन्यात अमित मिश्राने स्वत:च्या बोलिंगवर कॅच घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात मिश्राच्या उजव्या बोटाला दुखापत झाली होती.

संबंधित बातम्या :

IPL 2020 | बंगळुरु विरुद्धच्या सामन्याआधी दिल्लीला मोठा फटका, ‘हा’ अनुभवी खेळाडू स्पर्धेबाहेर

(Bhuvneshwar Kumar’s replacement pacer Prithvi Raj Yaara)