AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 : हैदराबादला दुखापतीचे ग्रहण, मिचेल मार्श पाठोपाठ ‘हा’ मोठा खेळाडू स्पर्धेबाहेर, हैदराबादला मोठा धक्का

हैदराबाद मागे लागलेलं दुखापतीचे ग्रहण थांबण्याचं नाव घेत नाहीये. (SRH Bowler Bhuvneshwar Kumar Ruled Out IPL 2020 )

IPL 2020 : हैदराबादला दुखापतीचे ग्रहण, मिचेल मार्श पाठोपाठ 'हा' मोठा खेळाडू स्पर्धेबाहेर, हैदराबादला मोठा धक्का
| Updated on: Oct 05, 2020 | 6:25 PM
Share

दुबई : सनरायजर्स हैदराबादची आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमाची पराभवाने सुरुवात झाली. हैदराबादचा  5 पैकी 3 सामन्यात पराभव झाला आहे. हैदराबाद मागे लागलेलं दुखापतीचे ग्रहण थांबण्याचं नाव घेत नाहीये. अष्टपैलू मिचेल मार्शला दुखापतीमुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमाला मुकावे लागले. या धक्क्यातून हैदराबाद सावरते, तेवढ्यातच हैदराबादला मोठा धक्का लागला आहे. हैदराबादचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) हीप इंजरीमुळे आयपीएलच्या या मोसमाला मुकावे लागले आहे. त्यामुळे हैदराबादसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. (SRH Bowler Bhuvneshwar Kumar Ruled Out Ipl 2020 )

नक्की काय झालं ?

चेन्नई विरुद्ध हैदराबाद यांच्यात 2 ऑक्टोबरला सामना खेळण्यात आला. या सामन्यात भुवनेश्वर कुमार आपल्या कोट्यातील चौथी ओव्हर टाकायला आला. त्याने पहिला चेंडू टाकला. त्याने ओव्हरमधील दुसरा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र  दुखापतीमुळे चेंडू टाकता आला नाही. यानंतरही त्याने ओव्हर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुखापत गंभीर होती. त्यामुळे भुवनेश्वरला अर्धवट ओव्हर सोडून ड्रेसिंगरुममध्ये परतावे लागले. त्यामुळे खलील अहमदने ओव्हरमधील उर्वरित चेंडू टाकले. भुवनेश्वरने आतापर्यंत यंदाच्या मोसमात फक्त 4 सामनेच खेळले होते. भुवनेश्वरला आपल्या संघासाठी मोसमाच्या अखेरपर्यंत खेळायचे होते. मात्र आता दुखापतीमुळे भुवनेश्वरला आयपीएलच्या 13 व्या मोसमाला मुकावे लागले आहे.

भुवनेश्वर कुमारची आयपीएल कारकिर्द

भुवनेश्वर कुमारने आयपीएलमध्ये 2011मध्ये पदार्पण केलं. त्याने 2011 पासून ते आतापर्यंत एकूण 121 सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने 136 विकेट्स घेतल्या. 19 धावा देऊन 5 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.ताज्या आकडेवारीनुसार, आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत भुवनेश्वर सहाव्या क्रमांकावर आहे. तसेच भुवनेश्वर 2016 आणि 2017 अशा सलग दोन वर्ष पर्पल कॅपचा (Purple Cap Winner) मानकरी राहिला आहे. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते.

दरम्यान याआधी हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शला दुखापतीमुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमाला मुकावे लागले आहे. मार्शच्या पायाच्या टाचेला झालेल्या दुखापतीमुळे त्याला या मोसमाला मुकावं लागलं आहे. मिचेल मार्शच्या जागी संघात जेसन होल्डरला संधी दिली आहे. हैदराबाद पॉइंट्स टेबलमध्ये 4 पॉइंट्ससह सातव्या क्रमांकावर आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020 : सनरायजर्स हैदराबादला मोठा धक्का, दुखापतीमुळे मिचेल मार्श स्पर्धेबाहेर

(SRH Bowler Bhuvneshwar Kumar Ruled Out IPL 2020 )

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.