AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी

हैदराबादने दिल्लीवर 88 धावांनी धमाकेदार विजय मिळवला.

IPL 2020, SRH vs DC : डेव्हिड वॉर्नर-ऋद्धीमान साहाचा दिल्लीला तडाखा, दोघांची रेकॉर्ड कामगिरी
| Updated on: Oct 28, 2020 | 12:19 AM
Share

दुबई : सनराजयर्स हैदराबादने दिल्ली कॅपिट्लसवर 88 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. तर दिल्लीचा हा या मोसमातील सलग तिसरा पराभव ठरला. हैदराबादने दिल्लीला विजयासाठी 220 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादच्या गोलंदाजांसमोर दिल्लीचा डाव 19 ओव्हरमध्येच आटोपला. दिल्लीचा संघ 131 धावांवर गारद झाला. कर्णधार बर्थडे बॉय डेव्हिड वॉर्नर आणि ऋद्धीमान साहा हे दोघे हैदराबादच्या विजयाचे हिरो ठरले. हैदराबादकडून प्रथम फलंदाजी करताना या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 107 धावांची शतकी भागीदारी केली. यासह या दोघांच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे. IPL 2020 Sunrisers Hyderabad David Warner And Riddhiman Saha Record Performance Against Delhi Capitals

काय आहे विक्रम?

वॉर्नर-साहा या जोडीने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये तडाखेबाज 77 धावा केल्या. यासह या जोडीने आयपीएलच्या 13 व्या मोसमात पावर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. हैदराबादचा पावर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा हा दुसरा सर्वाोच्च स्कोअर ठरला. याआधी हैदराबादने 2017 मध्ये पावर प्लेमध्ये 79 धावा केल्या होत्या.

तसेच डेव्हिड वॉर्नरने पावर प्लेमध्येच आपले अर्धशतक पूर्ण केलं. त्याने पावर प्लेमध्ये एकूण 54 धावा केल्या. आयपीएलच्या या मोसमात पावर प्लेमध्ये अर्धशतक ठोकणारा वॉर्नर हा पहिलाच फलंदाज ठरला. पृथ्वी शॉने याआधी पावर प्लेमध्ये या मोसमात 42 धावा केल्या होत्या.

डेव्हिड वॉर्नरने 34 चेंडूत 194.12 च्या स्ट्राईक रेटने 8 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 34 चेंडूत तडाखेदार 66 धावांची खेळी केली. तसेच फिल्डिंग करताना वॉर्नरने 2 कॅच घेतल्या. तर ऋद्धीमान साहाने 45 चेंडूत 193.33 च्या स्ट्राईक रेटने 12 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 87 धावा केल्या.

दरम्यान या विजयासह हैदराबादचा या मोसमातील हा 5 वा विजय ठरला. ताज्या आकडेवारीनुसार हैदराबाद पॉइंट्सटेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. हैदराबाद आपले आगामी सामने 31 ऑक्टोबरला बंगळुरुविरुद्ध आणि 3 नोव्हेंबरला मुंबईविरुद्ध खेळणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, SRH vs DC : सनरायजर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर 88 धावांनी शानदार विजय

India Tour Australia | के एल राहुलला कसोटीतही संधी, टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू बीसीसीआयवर संतापला

IPL 2020 Sunrisers Hyderabad David Warner And Riddhiman Saha Record Performance Against Delhi Capitals

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.