AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 Auction | अझरुद्दीन ते देवधर, झंझावाती फलंदाजी करणाऱ्यांवर फ्रँचायजींचा डोळा

आयपीएल 2021 च्या या लिलाव प्रक्रियेसाठी (ipl 2021 auction) फ्रँचायजींसह 292 खेळाडू उत्सुक आहेत.

IPL 2021 Auction | अझरुद्दीन ते देवधर, झंझावाती फलंदाजी करणाऱ्यांवर फ्रँचायजींचा डोळा
आयपीेएलच्या 14 व्या मोसमासाठी गुरुवारी खेळाडूंचा लिलाव होणार आहे.
| Updated on: Feb 17, 2021 | 6:59 PM
Share

चेन्नई | अवघ्या काही तासांवर आयपीएलचा 14 व्या पर्वातील लिलाव प्रक्रियेचा (IPL 2021 Auction) कार्यक्रम येऊन ठेपला आहे. या बोली प्रक्रियेसाठी एकूण 292 खेळाडूंची अंतिम यादी निवडण्यात आली आहे. या 292 खेळाडूंपैकी 62 खेळाडूंचीच निवड करण्यात येणार आहे. या 62 पैकी 39 भारतीय तर 22 परदेशी खेळाडू असणार आहेत. या 62 खेळाडूंवर 8 संघांची नजर असणार आहे. या मोसमात टी 20 स्पेशालिस्ट खेळाडूंवर फ्रँचायजींचं लक्ष असणार आहे. यापैकी 2 अनकॅप्ड भारतीय आणि 2 परदेशी खेळाडूंना आपल्या ताफऱ्यात घेण्यासाठी फ्रँचायजींमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. हे 4 खेळाडू नक्की कोण आहेत, त्यांची कामगिरी आपण पाहणार आहोत. (ipl 2021 auction Glenn Maxwell Kedar Devdhar Mohammad Azharuddin big demand in auction)

मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azharuddin)

केरळच्या ज्युनिअर मोहम्मद अझरुद्दीनला या लिलावातून मोठी लॉटरी लागू शकते. या पठ्ठ्याने मुंबईविरोधात तडाखेदार शतकी कामगिरी केली होती. मोहम्मदने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 37 चेंडूत शानदार तडाखेदार शतक लगावलं होतं. यासह मोहम्मद भारताकडून सर्वात वेगवान शतक झळकावणारा तिसराच फलंदाज ठरला. अझरुद्दीनने 54 चेंडूत 9 चौकार और 11 षटकारांसह एकूण 137 धावा केल्या होत्या. यामुळे मोहम्मदवर सर्व फ्रँचायजींची नजर असणार आहे.

केदार देवधर (Kedar Devdhar)

केदार देवधरने आपल्या नेतृत्वात बडोद्याला सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचवलं. त्याने या स्पर्धेत आपल्या बॅटिंगने धमाका केला. केदार या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसराच फलंदाज ठरला. 31 वर्षीय केदारने या स्पर्धेतील एकूण 8 सामन्यात 69.80 च्या सरासरीने 349 धावा केल्या. देवधर आयपीएलच्या पहिल्या सत्रात डेक्कन चार्जर्सचा सदस्य होता. पण त्यानंतर केदारला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळालीच नाही. त्यामुळे केदारला या लिलावात संधी मिळेल अशी आशा आहे.

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आयपीएलच्या 13 व्या मोसमात किंग्जस इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व करत होता. मात्र त्याला या मोसमात आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. या ऑस्ट्रेलियन खेळाडूला बर्‍याच वेळेस संधी दिली. पण त्याला आपल्या खेळाने टीम मॅनेजमेंटला प्रभावित करता आले नाही. त्यामुळे पंजाबने मॅक्सवेलला रिलीज केलं आहे. मॅक्लवेल हा अष्टपैलू खेळाडू आहे. मॅक्सवेल बॅटिंग बोलिंगसह दमदार फिल्डिंगही करतो. निर्णायक क्षणी सामना आपल्या बाजूने पालटण्याची क्षमता मॅक्सवेलमध्ये आहे, यामुळे मॅक्सवेलला आपल्या ताफ्यात समाविष्ठ करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळू शकते.

डेव्हिड मलान (Dawid Malan)

इंग्लंडचा डेव्हिड मलान (Dawid Malan) हा आयसीसीच्या टी 20 रॅकिंगमध्ये (Icc T 20I Ranking) पहिल्या क्रमांकावर आहे. यावरुन तो काय दर्ज्याचा खेळाडू आहे, याचा अंदाज येतो. पण डेव्हिड अजूनही आयपीएलमध्ये खेळलेला नाही. डेव्हिडने 19 टी 20 सामन्यांमध्ये 53 च्या सरासरीने 855 धावा केल्या आहेत. यामुळे डेव्हिड सारख्या फलंदाजाला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी फ्रँचायजींकडून मोठी बोली लावण्यात येऊ शकते.

संबंधित बातम्या :

IPL Auction 2021: हे सहा खेळाडू ठरू शकतात कोट्याधीश, आयपीएल लिलावात कोण होणार मालामाल?

आयपीएलसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये दबदबा, रोहित शर्माचा फेवरेट खेळाडू इंग्लडविरुद्ध मैदानात उतरणार?

IPL 2021 Auction Rules | आयपीएलच्या मिनी ऑक्शनदरम्यान सर्व फ्रँचायजींसाठी महत्वाचे 6 नियम

(ipl 2021 auction Glenn Maxwell Kedar Devdhar Mohammad Azharuddin big demand in auction)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.