AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Auction 2021: हे सहा खेळाडू ठरू शकतात कोट्याधीश, आयपीएल लिलावात कोण होणार मालामाल?

आयपीएल 2021 च्या या लिलाव प्रक्रियेसाठी (ipl 2021 auction) फ्रँचायजींसह 292 खेळाडू उत्सुक आहेत.

IPL Auction 2021: हे सहा खेळाडू ठरू शकतात कोट्याधीश, आयपीएल लिलावात कोण होणार मालामाल?
आयपीएल 2021 च्या या लिलाव प्रक्रियेसाठी (ipl 2021 auction) फ्रँचायजींसह 292 खेळाडू उत्सुक आहेत.
| Updated on: Feb 17, 2021 | 1:52 PM
Share

चेन्नई : आयपीएल 2021 च्या मिनी ऑक्शनसाठी ( IPL 2021 Mini Auction) आता फक्त एक दिवस बाकी आहे. आयपीएलमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. आयपीएलमध्ये क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडू या लिलावासाठी सज्ज आहेत. या लिलाव प्रक्रियेत एकूण 292 खेळाडू सहभागी होत आहेत. यामध्ये 144 भारतीय, 122 परदेशी आणि 3 असोशिएट संघाचे खेळाडू आहेत. या मिनी ऑक्शनमध्ये एकूण 292 पैकी 62 खेळाडूंचे भवितव्य ठरणार आहे. या 62 खेळाडूंवर 8 संघांची नजर असणार आहे. दरम्यान या लिलावात प्रत्येक फ्रॅंचायजींचे 6 स्टार खेळाडूंवर लक्ष असणार आहे. या खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी फ्रँचायजींमध्ये रस्सीखेच पाहायला मिळू शकते. लिलावात ज्या 6 स्टार खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होऊ शकतो. कोण आहेत ते खेळाडू, ह आपण जाणून घेणार आहोत. (ipl auction 2021 may top 6 player highest bid paid player in ipl 2021 auction)

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आयपीएलच्या 13 व्या मोसमात किंग्जस इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व करत होता. मात्र त्याला या मोसमात आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. या ऑस्ट्रेलियन खेळाडूला बर्‍याच वेळेस संधी दिली. पण त्याला आपल्या खेळाने टीम मॅनेजमेंटला प्रभावित करता आले नाही. त्यामुळे पंजाबने मॅक्सवेलला रिलीज केलं आहे. मॅक्लवेल हा अष्टपैलू खेळाडू आहे. मॅक्सवेल बॅटिंग बोलिंगसह दमदार फिल्डिंगही करतो. निर्णायक क्षणी सामना आपल्या बाजूने पालटण्याची क्षमता मॅक्सवेलमध्ये आहे, यामुळे मॅक्सवेलला आपल्या ताफ्यात समाविष्ठ करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळू शकते.

अ‍ॅलेक्स हेल्स (Alex Hales)

अ‍ॅलेक्स हेल्स हा टी 20 स्पेशालिस्ट खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये केवळ 6 सामनेच खेळले आहेत. 2018 मध्ये त्याने हैदराबादचे प्रतिनिधित्व केलं होतं. नुकत्याच पार पडलेल्या बिग बॅश लीगमध्ये (BBL 10) त्याने धमाकेदार कामगिरी केली. अ‍ॅलेक्सने या स्पर्धेत सर्वाधिक 543 धावा केल्या. यामध्ये त्याने 1 शतक आणि 3 अर्धशतकंही लगावलं. अ‍ॅलेक्स हा मॅच विनर बॅट्समन आहे. यामुळे अ‍ॅलेक्सवर या ऑक्शनमध्ये सर्वांची नजर असणार आहे.

ख्रिस मॉरिस (Chris Morris)

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिस (Chris Morris) आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळत होता. दरम्यान त्याला आता रिलीज करण्यात आले आहे. या 13 व्या मोसमात एकूण 9 सामन्यात त्याने 6.63 च्या इकॉनॉमी रेटने 11 विकेट्स घेतल्या होत्या. मॉरिस ऑलराऊंड प्लेअर आहे. टी 20 सारख्या छोट्या प्रकारात सर्व आघाड्यांवर दमदार खेळी करणाऱ्या खेळाडूची आवश्यकता असते. ते सर्व गुण मॉरिसमध्ये आहेत. यामुळे मॉरिसवर मोठी बोली लावण्यात येऊ शकते.

हरभजन सिंह (Harbhajan Singh)

हरभजन सिंहने 13 व्या मोसमातून वैयक्तिक कारणाने माघाार घेतली होती. या 14 व्या मोसमासाठी हरभजनला चेन्नईने रिलीज केलं आहे. हरभजन दिग्गज आणि अनुभवी फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आयपीएलमध्ये एकूण 160 सामने खेळले आहेत. यात त्याने 150 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच त्याला नेतृत्वाचा अनुभव आहे. यामुळे हरभजनला आपल्या गोटात घेण्यासाठी फ्रँचायजींमध्ये जोरदार स्पर्धा असणार आहे.

डेव्हिड मलान (David Malan)

इंग्लंडचा डेव्हिड मलान (David Malan) हा आयसीसीच्या टी 20 रॅकिंगमध्ये (Icc T 20I Ranking) पहिल्या क्रमांकावर आहे. यावरुन तो काय दर्ज्याचा खेळाडू आहे, याचा अंदाज येतो. पण डेव्हिड अजूनही आयपीएलमध्ये खेळलेला नाही. डेव्हिडने 19 टी 20 सामन्यांमध्ये 53 च्या सरासरीने 855 धावा केल्या आहेत. यामुळे डेव्हिड सारख्या फलंदाजाला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी फ्रँचायजींकडून मोठी बोली लावण्यात येऊ शकते.

स्टीव्ह स्मिथ (Steve Smith)

आयपीएलच्या या लिलावादरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथ महागडा खेळाडू ठरण्याची शक्यता आहे. स्टीव्हला नुकतंच राजस्थान रॉयल्सने स्मिथला रिलीज केले आहे. स्टीव्ह सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. रॉयल चॅलेंजर्ससह अनेक संघाना चांगल्या ओपनरची आवश्यकता आहे. त्यामुळे स्मिथसारखा आणखी चांगला खेळाडू दुसरा कोणीच नसू शकतो. यामुळे स्टीव्हला कोणता संघ खरेदी करतो आणि त्याला किती रक्कम मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL Auction 2021 Live Streaming | लिलाव कधी, कुठे, किती संघ सहभागी, कोणाकडे किती रक्कम?

IPL 2021 auction | लिलाव प्रक्रियेत 292 खेळाडू, जाणून घ्या 2 कोटींच्या बेस प्राईजमधील खेळाडूंची नावं

IPL 2021 : आयपीएलसाठी अर्जुन तेंडुलकर उपलब्ध, बेस प्राईस किती?

Ab De Villiers मालामाल; धोनी, विराट, रोहितनंतर IPL मध्ये सर्वाधिक कमाई

(ipl auction 2021 may top 6 player highest bid paid player in ipl 2021 auction)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.