MI vs RCB : हेल्मेटवर चेंडू मारणाऱ्या हार्दिकला रजत पाटीदारने शिकवला धडा, असा बदला घेतला की..VIDEO
MI vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कॅप्टन रजत पाटीदारने मुंबई इंडियन्स विरुद्ध सोमवारी वानखेडे स्टेडियमवर जबरदस्त बॅटिंग केली. हार्दिक पंड्याने सुरुवातीला पाटीदारच्या हेल्मेटवर चेंडू मारला होता. पंड्या आणि मुंबईचे सुरुवातीचे हल्ले पचवल्यानंतर त्याने काऊंटर हल्ला सुरु केला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कॅप्टन रजत पाटीदार सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2025 च्या सीजनमध्ये तो दमदार प्रदर्शन करतोय. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात वानखेडेवर सोमवारी रजत पाटीदारने जबरदस्त बॅटिंग केली. पाटीदारने या सामन्यात 32 चेंडूत 200 च्या स्ट्राइक रेटने 64 धावा फटकावल्या. या इनिंगमध्ये त्याने 4 सिक्स आणि 5 चौकार मारले. RCB च्या कॅप्टनने स्लो स्टार्ट केली होती. हार्दिक पंड्याने सुरुवातीला पाटीदारच्या हेल्मेटवर चेंडू मारला होता. पंड्या आणि मुंबईचे सुरुवातीचे हल्ले पचवल्यानंतर त्याने काऊंटर हल्ला सुरु केला. पाटीदारने पंड्याला चांगलाच धडा शिकवला.
देवदत्त पडिक्कल बाद झाल्यानंतर रजत पाटीदार 10 व्या ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. सुरुवातीला त्याने सावध फलंदाजी केली. पीच समजून घेतला. म्हणून पहिल्या 10 चेंडूत त्याने फक्त 8 धावा केल्या. 13 व्या ओव्हरमध्ये मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या स्वत: गोलंदाजीसाठी आला. पाटीदारने चौकाराने त्याचं स्वागत केलं. पुढच्याच चेंडूवर 2 धावा काढल्या.
पण तो थोडक्यात बचावला
त्यानंतर हार्दिक पंड्याने ऑफ साइडला एक फुलर लेंथ चेंडू टाकला. पाटीदारने ऑफ स्टम्पवर शफल होत स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू जोरात त्याच्या जबड्याखाली हेल्मेटच्या ग्रीलवर धडकला. त्याला गंभीर दुखापत होऊ शकली असती. पण तो थोडक्यात बचावला. पाटीदार याने घाबरला नाही. पुढच्याच चेंडूवर त्याने अपर कटच्या माध्यमातून चौकार मारला.
Innovation at its best! ❤
Rajat Patidar brings out some unorthodox shots against his opposite number 👀
Updates ▶ https://t.co/Arsodkwgqg#TATAIPL | #MIvRCB | @rrjjt_01 | @RCBTweets pic.twitter.com/RcRhhYEIJj
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2025
पंड्याच्या 14 चेंडूत 33 धावा फटकावल्या
रजत पाटीदार आणि हार्दिक पंड्याचा पुन्हा 15 व्या व 17 व्या ओव्हरमध्ये पुन्हा आमना-सामना झाला. 15 व्या ओव्हरमध्ये पाटीदारने 2 चेंडू खेळून 1 चौकार मारुन 5 रन्स केल्या. तेच 17 व्या ओव्हरमध्ये त्याने पंड्याची गोलंदाजी फोडून काढली. त्याने या ओव्हरमध्ये 4 चेंडू खेळून 17 धावा काढल्या. या दरम्यान पाटीदारने 2 सिक्स आणि 1 चौकार मारला. अशा प्रकारने पाटीदारने पंड्याच्या 14 चेंडूत 33 धावा फटकावल्या. म्हणजे रजत पाटीदारने 32 चेंडूतील 64 धावांच्या खेळीत निम्म्या धावा पंड्या विरुद्ध बनवल्या. त्याच्या या इनिंगमुळे बंगळुरुची टीम 20 ओव्हर्समध्ये 221 धावा करण्यात यशस्वी ठरली. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 9 गडी गमवून 209 धावा केल्या. त्यांना विजयासाठी 12 धावा कमी पडल्या.
