
गेल्या आठवड्यात 22 मार्चला आयपीएल 2025 च्या सीझनला सुरूवात झाली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमने सलग 2 विजयांसह IPL 2025 ची धडाक्यात सुरुवात केली. 28 मार्च रोजी सीएसके संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात आरसीबीने 50 धावांनी विजय मिळवला. पण विराट कोहली मात्र या सामन्यात धावा काढण्यासाठी धडपडताना दिसला. तो जास्त मोठी खेळीही करू शकला नाही. याचदरम्यान आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिस आहे. खरंतर हा व्हिडीओ कालची मॅच संपल्यानंतरचा आहे, त्यामध्ये विराट हा चेन्नईच्या एका खेळाडूवर चांगलाच भडकलेला दिसला.
CSK च्या खेळाडूशी विराटचं वाजलं ?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चेन्नई सुपर किंग्ज टीमचा वेगवान गोलंदाज खलील अहमद विराट कोहलीसोबत दिसतोय. मॅच संपल्यानंतर विराट कोहली रवींद्र जडेजासोबत उभा राहून हसत-मस्करी करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत होतं. तेवढ्यात खलील अहमद त्याच्या दिशेने आला. पण खलीलला पाहताच विराट कोहली रागाने काहीतरी बोलायला लागला. तर खलील अहमद शांतपणे त्याचं ऐकून घेत होता. त्यावेळी विराटच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तो खूपच चिडल्याचे दिसत होता. या सामन्यादरम्यानही या दोन खेळाडूंमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले होते.
Virat be lyk – next match chinnaswamy lo kanpadra nuvu kodaka .. 😂😂
Khaleel ahmed gadiki pant jaripodi odiley pic.twitter.com/MmphDbCUra
— VARMA (@AjjjuVarma) March 29, 2025
खरंतर, कालच्या सामन्यात, विराट कोहली हा खलील अहमदच्या गोलंदाजीवर बराच संघर्ष करताना दिसला आणि पहिल्याच चेंडूवर क्लोज कॉलमधून बचावला. त्याच षटकातील तिसरा चेंडू खलील अहमदने बाऊन्सर म्हणून टाकला, जो कोहलीने पुल प्रयत्न केला, पण चेंडू बॅटला लागला नाही. यानंतर फॉलो थ्रूवर खलील कोहलीच्या अगदी जवळ आला आणि बराच वेळ त्याच्याकडे पाहत राहिला. यानंतर विराटनेही खलीलकडे रागाने पाहिले. त्यामुळे सामना संपल्यानंतरी विराट त्याच मुद्यावरून तापलेला होता, आणि खलीलला सुनावत होता असं अनेकांना वाटलं.
No khaleel no bro😑 pic.twitter.com/krvrVH1FU5
— Naeem (@1eight_18) March 28, 2025
विराटने केल्या केवळ 31 धावा
कालची मॅच विराटसाठी फार खास नवह्ती. 30 चेंडू खेळत विराटने फक्त 31 धावाच केल्या. त्यादरम्यान त्याने 103.33 च्या स्ट्राईक रेटने धावा करत 2 चौकार आणि 1 सिक्सही मारली. मात्र, आयपीएल सीझनच्या पहिल्या सामन्यात विराटने शानदार खेळी करत केकेआरविरुद्ध नाबाद अर्धशतक झळकावत संघाला विजयाच्या समीप नेले होते.