AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : आयपीएल टुर्नामेंट ऐन रंगात असताना स्टार खेळाडूच्या गर्लफ्रेंडकडून नको ते काम, म्हणून हॉटेलवर..

IPL 2026 : आयपीएल टुर्नामेंटचा निम्मा सीजन होऊन गेला आहे. स्पर्धा आता रोमांचक वळणावर आहे. अशावेळी एका स्टार क्रिकेटच्या गर्लफ्रेंडमुळे नको ते घडलं आहे. तिने टीमबाबत नको ते काम केलं आहे.

IPL 2026 : आयपीएल टुर्नामेंट ऐन रंगात असताना स्टार खेळाडूच्या गर्लफ्रेंडकडून नको ते काम, म्हणून हॉटेलवर..
IPL 2026 Image Credit source: bcci
| Updated on: May 08, 2026 | 1:55 PM
Share

आयपीएलचा कुठलाही सीजन वादाशिवाय पूर्ण होत नाही. सध्या आयपीएल 2026 चा सीजन शांततेत सुरु होता. पण आता एक मोठा वाद समोर आला आहे. याचं कारण आहे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे पार्टनर, नातेवाईक. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या ओळखीचे काही लोक थेट त्यांच्या हॉटेल रुमपर्यंत जात होते. एका क्रिकेटरच्या गर्लफ्रेंडला टीमशी संबंधित माहिती लीक करताना पकडल्याचा सनसनाटी दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. या घटनेने बीसीसीआयला हादरवून सोडलं आहे. त्यामुळे बीसीसीआयने लगेच पावलं उचलत खेळाडूंशी संबंधित कुठल्याही व्यक्तीने रुमपर्यंत जाऊ नये यासाठी निर्बंध घातले आहेत.

BCCI ने गुरुवारी 7 मे च्या संध्याकाळी आयपीएलच्या 10 फ्रेंचायजींसाठी 8 पानांची गाइडलाइन जारी केली आहे. यात सुरक्षा आणि अन्य प्रोटोकॉलच्या उल्लंघनाच्या घटनांकडे लक्ष वेधण्यात आलं आहे. गाइडलाइनमध्ये कुठल्या खास घटनेचा उल्लेख करण्यात आलेला नाहीय. पण सर्व सूचनांच पालन करण्यास सांगण्यात आलं आहे. टीम मालकाचे पाहुणे, नातेवाईक, गर्लफ्रेंड, मित्र-मैत्रिणी कोणालाही लिखित परवानगीशिवाय खेळाडू, सपोर्ट स्टाफच्या रुममध्ये प्रवेश करता येणार नाही.

अचानक असं काय झालं?

आयपीएलचा सीजन सुरु असताना अचानक या सूचना आल्याने सगळेच हैराण झालेत. अचानक असं काय झालं? असे प्रश्न विचारले जात आहेत. अर्धा सीजन निघून गेल्यानंतर बीसीसीआयने हे निर्देश दिलेत. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या एका क्रिकेटरच्या गर्लफ्रेंडला टीमशी संबंधित माहिती बाहेर लीक करताना पकडलं आहे. क्रिकब्लॉगरने आपल्या रिपोर्टमध्ये हा खळबळजनक दावा केला आहे. ते सुद्धा एकदा नाही, दोनदा असा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर फ्रेंचायजीने लगेच या बद्दल बीसीसीआयला कळवलं.

बीसीसीआयकडून गाइडलाइन जारी

त्यानंतर बीसीसीआयने गाइडलाइन जारी केली आहे. त्याशिवाय बोर्डाच्या अँटी करप्शन युनिटने एका रिपोर्टमध्ये बोर्डाला अनेक प्रकारचे प्रोटोकॉल तोडण्यात आल्याची माहिती दिली आहे. हनी ट्रॅप आणि सुरक्षेला असलेले अन्य धोके या बद्दल बोर्डाने फ्रेंचायजींना सर्तक केलं आहे. हाय-प्रोफाइल स्पोर्ट्स वातावरणात टार्गेटेड कॉम्प्रोमाइज आणि हनीट्रॅप सारख्या घटनांचा धोका असतो. त्याशिवाय लैंगिक शोषणासारख्या गंभीर आरोपांची शक्यताही नाकारता येत नाही असं एडवायजरीत म्हटलं आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?