IPL 2026 : शेवटी ते टीम मॅनेजमेंट ठरवते, अखेर शार्दुल ठाकूरने हार्दिक पंड्याबद्दल सोडलं मौन

सूर्यकुमारच्या घरी बाळाचं आगमन झाल्याने तो या सामन्यात नव्हता. दोघांच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहला पहिल्यांदा मुंबई टीमचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. बुमराहने मुंबई इंडियन्सकडून 2013 साली डेब्यु केला होता.

IPL 2026 : शेवटी ते टीम मॅनेजमेंट ठरवते, अखेर शार्दुल ठाकूरने हार्दिक पंड्याबद्दल सोडलं मौन
shardul thakur-hardik pandya
Image Credit source: PTI
| Updated on: May 16, 2026 | 3:46 PM

आयपीएल 2026 मध्ये अनेक युवा खेळाडूंनी आपली छाप उमटवली आहे. त्याचवेळी जुन्या खेळाडूंनी वेगाने बदलणाऱ्या टी20 च्या विश्वात स्थान टिकवून ठेवण्यासाठी स्वत:च्या खेळाचा दर्जा उंचावला आहे. त्याचवेळी काही असे सुद्धा खेळाडू आहेत, ज्यांनी टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये व्यक्तीगत आणि सांघिक पातळीवर टीमसाठी जबरदस्त प्रदर्शन केलं. पण आयपीएलमध्ये त्यांना त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. यात हार्दिक पंड्या आणि सूर्युकमार यादव ही प्रमुख नावं आहेत. ते यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्ससाठी चमकदार कामगिरी करु शकले नाहीत. याआधीच्या सीजनमध्ये या दोन्ही खेळाडूंनी जबरस्दत प्रदर्शन केलं आहे. मुंबई इंडियन्स या सीजनमध्ये जेतेपदाच्या शर्यतीतून आधीच बाहेर गेली आहे. आता उर्वरित सामने त्यांच्यासाठी फक्त औपचारिकता मात्र आहेत.

मुंबई इंडियन्स चालू सीजनमध्ये 9 व्या स्थानावर आहे. 12 पैकी त्यांनी फक्त चार सामने जिंकले आहेत. पंजाब किंग्सविरुद्ध दोन दिवसांपूर्वी मुंबईने रोमांचक विजय मिळवला. पण त्याचा काही फायदा नाहीय. पंजाब किंग्सच आव्हान मुंबई इंडियन्सने अजून कठीण बनवून ठेवलं आहे. पंजाब विरूद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्यकुमार दोघे खेळत नव्हते.

हार्दिक बद्दल शार्दुल काय म्हणाला?

पंजाब किंग्स विरूद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूरने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने 4 ओव्हरमध्ये 39 धावा देऊन चार विकेट काढले. मुंबई टीमच्या सध्याच्या प्रवासात हार्दिक पंड्या सोबत दिसत नाहीय. मागच्या दोन-तीन सामन्यांपासून हार्दिक टिममध्ये दिसला नाहीय. मुंबई इंडियन्स आणि हार्दिकमध्ये अंतर निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. हार्दिकबद्दल निर्माण झालेलं हे संशयाच धुंक शार्दुलने दूर केलं. बुधवारी 20 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात हार्दिक खेळताना दिसेल असं शार्दुल ठाकूर म्हणाला.

म्हणजे क्वालिटी मिस करण्यासारखं

“हार्दिक दुखापत झाल्यामुळे तो मागचे दोन-तीन सामने टीम सोबत नव्हता. तो 10 मे रोजी रायपूरला गेलेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरूद्धच्या सामन्यासाठी. पण तो खेळू शकला नाही. तो सध्या मुंबईत आहे. तिथे ट्रेनिंग करतोय. पुढच्या बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सामन्यात तो खेळताना दिसेल अशी मला अपेक्षा आहे. त्याच्यासारखा खेळाडू नसणं म्हणजे क्वालिटी मिस करण्यासारखं आहे” असं शार्दुल म्हणाला.

पण शेवटी टीम मॅनेजमेंट ठरवते

आयपीएलच्या पुढच्या सीजनसाठी हार्दिकची ट्रेड होणार का? म्हणजे तो दुसऱ्या टीमकडून खेळणार का?. यावर शार्दुलने लगेच या अफवा फेटाळून लावल्या. “सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु असतात. काही बरोबर असतात. काही चुकीच्या असतात. पण शेवटी टीम मॅनेजमेंट ठरवते” असं शार्दुल म्हणाला.

Follow Us