AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : समोसा खायची इच्छा झाली, लोको पायलटने थेट रेल्वेच थांबवली? त्या व्हिडीओची तुफान चर्चा!

आता संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. लोको पायलटने कोणत्या अधिकाराखाली रेल्वे थांबवली. त्याला रेल्वे थांबवण्यासाठी आदेश मिळालेला होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Video : समोसा खायची इच्छा झाली, लोको पायलटने थेट रेल्वेच थांबवली? त्या व्हिडीओची तुफान चर्चा!
railway loco pilot stopped railway for samosaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 08, 2026 | 6:08 PM
Share

भारतात रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास हा सर्वाधिक सुरक्षित आणि किफायतशीर मानला जातो. म्हणूनच गरिबांपासून ते मध्यमवर्गीयांपर्यंत सगळे रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देतात. रेल्वेचा प्रवास सुरळित आणि सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांना नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. कामात कुचराई केल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाते. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये एक अजब असा प्रकार समोर आला आहे. रेल्वेच्या चालकाने म्हणजेच लोको पायलटने चक्क समोसा खाण्यासाठी रेल्वे थांबवली आहे.

लोको पायलट चक्क समोशाच्या दुकानावर

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओ एक व्यक्ती रेल्वेच्या लोको पायलटवर गंभीर आरोप करत आहे. संबंधित लोको पायलटने फक्त समोसे खाण्यासाठी बेकायदेशीररित्या रेल्वे थांबवली आहे, असा आरोप या व्हिडीओत करण्यात आला आहे. संबधित व्हिडीओत रेल्वे रुळावर रेल्व उभी असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे रेल्वे चालवणारा लोको पायलट चक्क समोशाच्या दुकानावर गेलेला दिसतोय.

रेल्वे थांबवली पण…

लोको पायलटने काही समोसे खरेदी केले आहेत. समोशांची पिशवी घेऊन तो पुन्हा रेल्वेत जाताना दिसतोय. त्यानंतर थोड्या वेळाने रेल्वे चालू होतानाही व्हिडीओमध्ये दिसत आहे. म्हणूनच फक्त समोसे खाण्यासाठी लोको पायलटने संपूर्ण रेल्वे थांबवली होती, असा दावा केला जातोय.

रेल्वे कुठे थांबवायची, किती वेळ थांबवायची….

दरम्यान, आता संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. लोको पायलटने कोणत्या अधिकाराखाली रेल्वे थांबवली. त्याला रेल्वे थांबवण्यासाठी आदेश मिळालेला होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रेल्वे कुठे थांबवायची, किती वेळ थांबवायची यासाठी काही नियम असतात. समोरून आदेश आल्याशिवाय रेल्वे कुठेही मध्येच थांबवता येत नाही. असे असताना लोको पायलटने मध्येच रेल्वे थांबवली का? असाही सवाल उपस्थित केला जातोय.

दरम्यान, आता संबंधित लोको पायलटची चौकशी केली जाणार आहे. चौकशीतून सत्य समोर आल्यानंतर कारवाई केली जाणार आहे.

Follow Us
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी