IRE vs IND Toss : टीम इंडियाची आयर्लंड विरुद्ध फिल्डिंग, वैभवला संधी देण्याबाबत कॅप्टन श्रेयस काय म्हणाला?
Ireland vs India 1st T20I Toss : टीम इंडियाचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याचं आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण होईल, असा विश्वास चाहत्यांना होता. मात्र वैभवला पदार्पणाची संधी मिळालेली नाही.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20i मालिकेतील (Ireland vs India 1st T20i) पहिल्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. उभयसंघातील सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 5 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज यजमान संघाला किती धावांवर रोखण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वैभव सूर्यवंशीला संधी नाही, कर्णधार श्रेयसने काय म्हटलं?
आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यातून टीम इंडियाचा 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळेल अशी आशा चाहत्यांना होती. मात्र वैभवला पदार्पणासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. वैभवला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही.
कर्णधार श्रेयसला टॉसनंतर वैभवच्या खेळण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर श्रेयसने “दुर्दैवाने, नाही . वैभवला योग्य वेळ आल्यावर नक्कीच संधी मिळेल. सध्या आम्ही तीन अस्सल वेगवान गोलंदाज आणि एका अष्टपैलू खेळाडूच्या जोडीने मैदानात उतरत आहोत”, अशी प्रतिक्रिया दिली.
भारतीय वंशाच्या खेळाडूला संधी
दरम्यान आयर्लंड क्रिकेट टीमकडून भारतीय वंशाच्या खेळाडूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. या वेगवान गोलंदाजाचं जय मूंद्रा असं नाव आहे. जय हा मुळचा राजस्थानचा आहे. वेगवान गोलंदाज असलेला जय दोन्ही बाजूने बॉल फिरवण्यात माहीर आहे. मुंद्रा वयाच्या 24 व्या वर्षी आयर्लंडला गेला होता. त्यामुळे हा जय भारतीय फलंदाजांसमोर कशी गोलंदाजी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय
🚨 Toss 🚨#TeamIndia have won the toss and elected to bowl in the 1️⃣st T20I.
Updates ▶️ https://t.co/gdoXw2dAKR#IREvIND pic.twitter.com/8IwAOVZlUF
— BCCI (@BCCI) June 26, 2026
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा.
आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन : टीम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), बेंजामिन कॅलिट्झ, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, लियाम मॅककार्थी, मॅथ्यू हम्फ्रेज, जय मुंद्रा आणि मॅथ्यू हॉलार्ड.