AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : 1 मालिका-3 सामने, टीम इंडिया टी 20i सीरिज खेळणार, कधी-कुठे? जाणून घ्या

Indian Cricket Team : टीम इंडियाचे खेळाडू सध्या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमासाठी आपआपल्या टीमसह आहेत. यानंतर टीम इंडिया टी 20i मालिका खेळणार आहे. जाणून घ्या सविस्तर.

Team India : 1 मालिका-3 सामने, टीम इंडिया टी 20i सीरिज खेळणार, कधी-कुठे? जाणून घ्या
Suryakumar Yadav Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Mar 20, 2026 | 4:36 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आता अपवाद वगळता सर्व खेळाडू आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी सज्ज झाले आहेत. या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या नव्या टी 20i मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेत उभयसंघात एकूण 3 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. आता फक्त मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात या मालिकेचं आयोजन करण्यात येणार आहे. आयपीएलनंतर टीम इंडिया वनडे आणि टी 20i सीरिजसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार होती. मात्र त्याआधी आता भारतीय संघ आयर्लंड विरुद्ध 2 हात करणार आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20i व्यतिरिक्त 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात ही 1 जुलैपासून होणार आहे. तर आयपीएलच्या 19 व्या मोसमाची सांगता मे महिन्याच्या शेवटपर्यंत होणार. त्यामुळे भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील मालिका जून महिन्यात होणार हे निश्चित आहे. आता बीसीसीआय वेळापत्रक केव्हा जाहीर करते याचीच प्रतिक्षा चाहत्यांना आहे.

टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड

टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयर्लंड विरुद्ध अजिंक्य आहे. उभयसंघात होणारी ही चौथी टी 20i मालिका असणार आहे. भारताने आतापर्यंत आयर्लंडमध्ये एकूण 6 टी 20i सामने जिंकले आहेत. तसेच उभयसंघात एकूण 8 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या 8 सामन्यात विजय मिळवला आहे.

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात 5 टी 20i सामने खेळणार आहे. त्यानंतर उभयसंघात 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. उभयसंघात 1 ते 11 जुलै दरम्यान टी 20i मालिका होणार आहे. तर त्यानंतर 14 ते 19 जुलै दरम्यान वनडे सीरिज होणार आहे.

आता प्राधान्य वनडे क्रिकेटला

दरम्यान आगामी एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तुलनेत टी 20i क्रिकेटला इतकं महत्त्व नसेल. आगामी 2027 च्या वनडे वर्ल्ड कपचं आयोजन हे दक्षिण आफ्रिकेत करण्यात येणार आहे. त्यामुळे टीम इंडियाची मिशन वर्ल्ड कप 2027 च्या हिशोबाने तयारी सुरु झाली आहे. यानुसार टीम इंडियाचा इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे.

Follow Us
कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत...
Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी...
तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी... पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक
Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक
शिंदे-ठाकरे एकत्र या... शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक...
मोठी बातमी! शिंदे-ठाकरे एकत्र या... शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक; राजकीय समीकरणं बदलणार?
बंडखोर खासदारांच्या खासदारकीची प्रक्रिया पुर्ण होऊच शकत नाही...
बंडखोर खासदारांच्या खासदारकीची प्रक्रिया पुर्ण होऊच शकत नाही', बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्... पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजे
पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्... पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजेंबाबत मोठं विधान; महायुतीत आता...
आमदारकीचं गुपित उघडलं? देवाभाऊंकडे दैवी शक्ती...; त्या नेत्याच्या
आमदारकीचं गुपित उघडलं? देवाभाऊंकडे दैवी शक्ती...; त्या नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ!
निधी मिळत नाही कारण...निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य
Sushma Andhare | निधी मिळत नाही हे कारण...तर निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य
नेते काँग्रेसचे मात्र मतं गेली महायुतीला... बड्या नेत्याने अखरे सांगित
Vidhan Parishad | नेते काँग्रेसचे मात्र मतं गेली महायुतीला... बड्या नेत्याने अखरे सांगितलंच
दार उघडलं आणि सर्वजण हादरले'; डॉक्टरांच्या केबिनमध्ये नेमकं काय घडलं?
दार उघडलं आणि सर्वजण हादरले; डॉक्टरांच्या केबिनमध्ये नेमकं काय घडलं?