Ind vs Aus नागपूर टेस्टपूर्वी ‘पिच गेम’, इरफाननं फोटो शेअर करत सांगितलं की…
India Vs Australia Test:नागपूरमधील खेळपट्टीवर आजी माजी खेळाडू भिडले. भारतीय संघाचा माजी गोलंदाच इरफान पठाणनं एक फोटो शेअर ऑस्ट्रेलियन टीकाकारांची खिल्ली उडवली आहे. नागपूरमध्ये 9 फेब्रुवारीपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

मुंबई: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये आहे. चार सामन्यांची कसोटी मालिका भारताला टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे भारतीय संघाला ही मालिका 3-0 ने जिंकणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ जोरदार तयारी करत आहे. असं असताना मैदानाबाहेर पिचवरुन जोरदार वाकयुद्ध सुरु झालं आहे. सामन्यापूर्वी नागपूरमधील पिचचा आढावा ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ याने घेतला. त्यानंतर मीडियाशी चर्चा करताना पिचबाबत संशय व्यक्त केला. “खेळपट्टीचा एक खूप सुकलेला आहे. यामुळे लेफ्ट आर्म स्पिनर्सला मदत मिळू शकते. लेफ्ट आर्म स्पिनरचा चेंडू थेट आत येऊ शकतो.” स्टीव्ह स्मिथच्या या वक्तव्यानंतर भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणनं टीकास्त्र सोडलं आहे.
इरफान पठाणनं एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोतील खेळपट्टीला जबरदस्त भेग्या पडल्याचं दिसत आहे. तर कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘चला अजून एका क्रॅकिंग मालिकेचा आनंद घेऊयात.’ पठाणने शेअर केलेला फोटो 2013 मधील वाकामधील आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडच्या दुसऱ्या कसोटीसाठी ही खेळपट्टी तयार केली होती. या खेळपट्टीवरून टीकेची झोड उठली होती. ऑस्ट्रेलियाने हा सामना 150 धावांनी जिंकत सिरीज आपल्या नावे केली होती.
Let’s have a cracking series #BGT2023 pic.twitter.com/P18q1mNFPB
— Irfan Pathan (@IrfanPathan) February 8, 2023
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं सांगितलं की, ऑस्ट्रेलियन खेळाडू या खेळपट्टीचा फायदा घेतील. काही ठिकाणी आव्हानात्मक असेल पण आम्ही फलंदाजीने ही समस्या दूर सारू. आमच्या संघात चांगले फलंदाज असून सामन्यादरम्यान दिसून येईल.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
- पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर
- दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली
- तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा
- चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.
