AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा टेस्ट रेकॉर्ड धोक्यात?, जो रुट पहिल्यांदाच व्यक्त झाला….

जर इंग्लिश फलंदाज जो रुट याने आपला सध्याचा फॉर्म जरी कायम राखला तरी सचिन तेंडुलकर याचा सर्वात मोठा टेस्ट क्रिकेटचा रेकॉर्ड तुटू शकतो. हेच कारण आहे की क्रिकेट चाहत्यांच्या नजरा आता जो रुट याच्या प्रत्येक इनिंग्सवर लागल्या आहेत.

सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा टेस्ट रेकॉर्ड धोक्यात?, जो रुट पहिल्यांदाच व्यक्त झाला....
Joe Root on Sachin Tendulkar record
| Updated on: May 23, 2026 | 4:15 PM
Share

क्रिकेटचा देव म्हटला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा टेस्ट क्रिकेटमधील सर्वात मोठी रेकॉर्ड आता धोक्यात सापडणार आहे. इंग्लंडचा माजी कप्तान आणि दिग्गज फलंदा जो रुट ज्या प्रकार धावा करत आहे. त्या पाहून संपूर्ण क्रिकेट विश्वात आता एक प्रश्न विचारला जात आहे की रुट भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकर याला तो मागे टाकणार का ?

इंग्लंडचे दिग्गज फलंदाज जो रुट टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन बनवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहेत. जो रुटच्या नावावर १६३ टेस्ट मॅचमध्ये १३,९४३ रन नोंदले गेले आहेत. तर सचिन तेंडुलकर याने २०० टेस्ट मॅचमध्ये १५,९२१ रन बनवून नंबर एक काबिज केला आहे. म्हणजे जो रुट सचिनचा ऐतिहासिक रेकॉर्ड तोडण्यापासून केवळ १,९७९ रन दूर आहे.

न्यूझीलंडच्या विरुद्ध आगामी टेस्ट सिरीजच्या आधी जेव्हा जो रुट याला या रेकॉर्ड संदर्भात विचारण्यात आले तेव्हा त्याने पहिल्यांदा मोकळेपणे प्रतिक्रीया दिली. सर्वसाधारणपणे या प्रश्नाला नेहमीच बगल देणाऱ्या रुट याने यावेळी सचिनचे मुक्तकंठाने कौतूक केले आणि म्हटले जर सचिन सोबत तुलना होणे हीच गोष्ट माझ्यासाठी सर्वात मोठी आहे.

सचिनची कामगिरी अविश्वसनीय ..

जो रुट याने सांगितले की सचिन यांनी टेस्टमध्ये डेब्यु माझ्या जन्माआधी केले होते आणि माझ्या टेस्ट डेब्यु पर्यंत खेळत राहिले. त्यांचे दीर्घ करियर आणि कामगिरी अविश्वसनीय आहे. केवळ टेस्ट क्रिकेटच नाही, तर त्यांनी वनडेतही ४९ शतक ठोकले आहे. जो रुट याने हे देखील स्वीकार केले की इतका दीर्घकाळापर्यंत सातत्याने कामगिरी कायम राखणे सोपे असत नाही.

जो रुट यांनी सांगितले की मी आजही आपल्या फलंदाजीत सुधार करणे आणि नवीन गोष्ट जोडण्यासाठी प्रयत्न करत असतो. जो रुट म्हणतात की मी नेहमी स्वत:ला अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करत असतो. ‘मला वाटते मॅच दरम्यान तांत्रिक गोष्टींवर विचार करण्याची गरजच न पडो आणि मी केवळ खेळावर फोकस देऊ शकेल.’ ‘ साल २०२० नंतर जो रुट टेस्ट क्रिकेटमध्ये वेगळ्याच स्तरावर फलंदाजी करत आहे. त्याने सतत मोठे स्कोर केले आहेत. जो रुट विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यम्स सारख्या फॅब-४ फलंदाजापासून टेस्ट क्रिकेटमध्ये खूप पुढे गेला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...