Sania Mirza: ‘कहीं आग लगे लग जावे, टूटे दिल की पीड़…’, हैदराबादमध्ये सानिया मिर्झाला कोणाची येत्ये आठवण ? VIDEO VIRAL
माजी टेनिसपटू सानिया मिर्झा सध्या भारतात आहे. मात्र, अलीकडेच माजी तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तिचा अवतार पाहून चाहते हैराण झाले आहेत. असं काय झालं सानियासोबत ?

Sania Mirza : भारताची माजी टेनिसपटून सानिया मिर्झा ही दुबईला शिफ्ट होऊन बराच काळ उलटला आहे. मात्र असं असलं तरी कामामुळे , त्या निमित्ताने ती बऱ्याचदा भारतात येत असते. चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय असलेली सानिया मिर्झा सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. आणि त्याचं कारण म्हणजे तिची नुकतीच आलेली एक पोस्ट, जी सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरली आहे.
सानिया मिर्झाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती एका गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहे. तिच्या या कूल स्टाईलला लोकांची खूप पसंती मिळत आहे. याशिवाय, तिच्या पोस्टच्या कॅप्शननेही चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
कूल अंदाजात दिसली सानिया मिर्झा
खरंतर, सानिया मिर्झाने शेअर केलेल्या मजेदार व्हिडिओमध्ये ती तिच्या मैत्रिणींसोबत दिसत आहे. ‘कहीं आग लगे लग जावे, कहीं नाग डसे-डस जावे, इस टूटे दिल की पीड़ा सही ना जाए…’ या गाण्यावर ती आणि तिच्या मैत्रिणी मजेशीर अंदाजात डान्स करताना या व्हिडीओमध्ये दिसतात. खरंतर सानिया मिर्झा सोशल मीडियावर अशा क्लिप्स कधी शेअर करत नाही. पण यावेळी सानियाचा कूल अंदाज दिसला असून त्यावर तिचे चाहते एकदम फिदा झाले आहेत. सानियाचा हा व्हिडीो तिच्या चाहत्यांसाठी म्हणजे जणू एखादी मेजवानीच आहे.
View this post on Instagram
माजी टेनिस स्टारने फ्रेंड्ससोबत केला डान्स
खरंतर ताल चित्रपटातलं हे गाणं हृदयभंग आणि उदासी दर्शवतं. पण सानिया आणि तिच्या फ्रेंड्सनी मात्र या गाण्यावर मजेशीर अंदाजात परफॉर्म केलं आहे. या गाण्यात सानिया व इतर मैत्रिणींनी त्यांच्या स्टेप्सनी आग लावली. त्यासोबत एक कॅप्शनही लिहीली आहे, ‘कारण आता Cringe हेच नवे चलन आहे.’ सोशल मीडियावर या रीलला खूप पसंती मिळत आहे. युजर्स सानियाच्या कूल स्टाईलचे कौतुक करत आहेत. तर काही युजर्स म्हणाले की क्रिंज अंदाज तुझ्यावर कूल दिसतो. तर काही युजर्स म्हणाले की तू खूप छान काम करत्ये. सानिया मिर्झा एखाद्या ब्रँड प्रमोशन किंवा कार्यक्रमासाठी भारतात आल्याचे वृत्त आहे. या दरम्यान तिने हैदराबादमध्ये तिच्या कुटुंबियांची आणि मित्रांचीही भेट घेतली.
घटस्फोटानंतर एकटी घेत्ये मुलाची काळजी
सानिया मिर्झाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर, सानिया तिचा मुलगा इझहान याला एकटीच वाढवत आहे. ती तिच्या मुलासोबत दुबईमध्ये राहते जिथे तिची टेनिस अकादमी आहे. रिपोर्टनुसार, जेव्हा सानियाचा घटस्फोट झाला तेव्हा तिच्या मुलानेच तिला वेदनांवर मात करण्यास आणि आयुष्यात पुढे जाण्यास मदत केली.
