Sunil Gavaskar : अभिषेक शर्माला सुनील गावस्कर यांचा अत्यंत मोलाचा सल्ला, तू फक्त एक काम करं की..

Sunil Gavaskar : अभिषेक शर्माकडून टीम इंडियाला भरपूर अपेक्षा आहेत. आतापर्यंत वर्ल्ड कपच्या दोन सामन्यात तो खेळलाय. एक सामन्यात आजारपणामुळे त्याला खेळता आलं नाही. अभिषेक शर्माचा फॉर्मसाठी संघर्ष सुरु आहे. त्याला सुनील गावस्कर यांनी अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे.

Sunil Gavaskar : अभिषेक शर्माला सुनील गावस्कर यांचा अत्यंत मोलाचा सल्ला, तू फक्त एक काम करं की..
Abhishek Sharma
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 18, 2026 | 3:39 PM

भारताचा स्टार ओपनर अभिषेक शर्माचा टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये संघर्ष सुरु आहे. वर्ल्ड कप आधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 सीरीजमध्ये अभिषेकने खोऱ्याने धावा केल्या आहेत. पण सध्या अभिषेक आऊट ऑफ फॉर्म आहे. या कठीण काळात टीम इंडियाचा माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी अभिषेकला मोलाचा सल्ला दिला आहे. USA आणि पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात अभिषेकला छाप उमटवता आली नाही. तो लवकर बाद झाला. नामीबिया विरूद्धच्या सामन्यात आजारी असल्यामुळे तो खेळू शकला नव्हता. अभिषेक शर्माचा नैसर्गिक खेळ हा आक्रमक आहे. तो प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजाला स्वत:वर वरचढ होऊ देत नाही. पहिल्या चेंडूपासून त्याच्यावर तुटून पडतो. सुनील गावस्कर यांनी अभिषेकला सर्वप्रथम बेसिक्सवर लक्ष द्यायला सांगितलं आहे.

“माझा अभिषेक शर्माला एक सल्ला आहे, पहिली सिंगल धाव घे, बस्स. त्यानंतर तू तुझा नैसर्गिक खेळ सुरु करं. पहिला फक्त सिंगल घे. त्यामुळे तुझ्या पायाची हालचाल होईल. त्यानंतर सुरु हो” असं सुनील गावस्कर स्पोर्ट्स टुडेशी बोलताना म्हणाले. “हा एखाद्याचा स्वत:वर असलेला आत्मविश्वास आहे. न्यूझीलंड विरुद्ध त्याने शंभर धावा केल्या. तो चांगल्या फॉर्म आणि टचमध्ये आहे. त्याचा तो फायदा उचलतोय. महत्वाचं हे आहे की, अभिषेक त्याच्या चांगल्या फॉर्मला गृहित धरत नाहीय.अनेक फलंदाज असं करतात. एकदा तुम्ही स्थिरावलात की, तुम्ही तुमचा नैसर्गिक खेळ करु शकता. तेच आपण त्याच्याकडून पाहिलय” असं सुनील गावस्कर म्हणाले.

तो खूप घाई करतोय अशी चर्चा

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्माकडून भरपूर अपेक्षा आहेत. पण आजरपण आणि खराब सुरुवातीमुळे त्याला चांगली सुरुवात करता येत नाहीय. नामीबिया विरुद्ध सामन्याच्यावेळी तो हॉस्पिटलमध्ये होता. त्यामुळे त्या सामन्यात तो खेळू शकला नाही. पाकिस्तानी आणि USA दोन्ही टीम्स विरुद्ध अभिषेक शुन्यावर आऊट झालाय. दोन्हीवेळा त्याची आऊट होण्याची पद्धत पाहून तो खूप घाई करतोय अशी चर्चा आहे. आधी धाव घे, क्रीजवर थोडावेळ थांब आणि सुरु हो हाच गावस्कर यांनी अभिषेक शर्माला सल्ला दिलाय.