फुटबॉलसाठी घरातून पळून गेलेल्या कोल्हापूरच्या तरुणीला मानाचं पद

कोल्हापूर: फुटबॉलच्या प्रेमापोटी शालेय वयात घर सोडून पळून गेली, पुण्यात विविध टप्प्यांवर फुटबॉल खेळली आणि आज तीच तरुणी आशियाई फुटबॉल ग्रासरुट समितीवर नियुक्त झाली. ही प्रेरणादायी कथा आहे कोल्हापुरातील गडहिंग्लजच्या अंजू तुरंबेकर या तरुणीची. आशियाई फुटबॉल संघाच्या ग्रासरुट समितीवर निवड होणारी अंजू ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. त्यामुळे अंजूच्या रुपाने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक …

, फुटबॉलसाठी घरातून पळून गेलेल्या कोल्हापूरच्या तरुणीला मानाचं पद

कोल्हापूर: फुटबॉलच्या प्रेमापोटी शालेय वयात घर सोडून पळून गेली, पुण्यात विविध टप्प्यांवर फुटबॉल खेळली आणि आज तीच तरुणी आशियाई फुटबॉल ग्रासरुट समितीवर नियुक्त झाली.

ही प्रेरणादायी कथा आहे कोल्हापुरातील गडहिंग्लजच्या अंजू तुरंबेकर या तरुणीची. आशियाई फुटबॉल संघाच्या ग्रासरुट समितीवर निवड होणारी अंजू ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. त्यामुळे अंजूच्या रुपाने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. अंजू तुरंबेकर या सध्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या तालिकेवरील पंच आहेत. अंजू यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. फुटबॉलची कुठलीही पार्श्वभूमी त्यांना नव्हती. केवळ जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे.

हॉलंड येथे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी अनेक तंत्रे शिकून घेतली.

2018 मध्ये एएफसीतर्फे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ‘ए’ लायसन्स परीक्षा पास होण्याचा मान देखील त्यांनी मिळवला.  प्रशिक्षणातील प्रदीर्घ अनुभव पाहता भारतीय फुटबॉल महासंघाने त्यांची निवड अशिया फुटबॉल महासंघाच्या ग्रासरूट डेव्हलपमेंट समितीवर नियुक्त करावी अशी शिफारस केली होती.

मुलगी म्हणून फुटबॉल खेळताना मला ज्या अडचणी आल्या त्या नव्यानं खेळणाऱ्या मुलींना येऊ नयेत यासाठी काम करणार असल्याचे अंजू यांनी यावेळी सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *