AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lionel Messi: मेस्सी वर्ल्ड कप जिंकणार हे 494 दिवस आधीच ठरलं होतं, 339 कोटींची डील आणि फ्रान्स चितपट

Lionel Messi: मेस्सीच्या विजयामागची 'ती' 339 कोटींची डील नेमकी आहे तरी काय?

Lionel Messi: मेस्सी वर्ल्ड कप जिंकणार हे 494 दिवस आधीच ठरलं होतं, 339 कोटींची डील आणि फ्रान्स चितपट
Lionel messi ArgentinaImage Credit source: Getty/instagram
| Updated on: Dec 19, 2022 | 2:27 PM
Share

FIFA World Cup 2022 च्या फायनलमध्ये लियोनल मेस्सीने कमालीचा खेळ दाखवला. पेन्लटी शूटआऊटमध्ये फ्रान्सला नमवून अर्जेंटिनाची टीम तब्बल 36 वर्षांनी वर्ल्ड चॅम्पियन बनली. अर्जेंटिनाच्या वर्ल्ड कप विजयानंतर एक अजब योगायोग समोर आलाय. हा योगायोग असा होता की, अर्जेंटिना वर्ल्ड कप जिंकणार हे 494 दिवस आधीच निश्चित झालं होतं. जाणून घेऊया कसं ते.

डीलमुळे कसं ठरलं?

फिफा वर्ल्ड कप 2022 फायनलच्या 494 दिवस आधी मेस्सीने फ्रान्सचा क्लब PSG सोबत दोन वर्षाचा एक कॉन्ट्रॅक्ट केला होता. 11 ऑगस्ट 2021 रोजी ही डील झाली होती. या करारानुसार, मेस्सीला वर्षाला 339 कोटी रुपये मिळणार आहेत. या डीलनंतर मेस्सीच वर्ल्ड चॅम्पिन बनणं, कसं निश्चित झालं, ते समजून घेऊया. PSG ने कुठल्या खेळाडूसोबत डील केली आणि त्याने पुढच्याच वर्षी आपल्या टीमला वर्ल्ड चॅम्पिन बनवलय. हे सलग दुसऱ्यांदा झालय.

त्याने फ्रान्सला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं

मेस्सीने वर्ष 2021 मध्ये पॅरिस सेंट जर्मेन क्लबसोबत करार केला. 2022 मध्ये त्याने अर्जेंटिनला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं. 2017 मध्ये पॅरिस सेंट जर्मेनने एमबाप्पेला करारबद्ध केलं होतं. पुढच्याचवर्षी 2018 मध्ये त्याने फ्रान्सला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं.

2002 मध्येही असं घडलंय

मेस्सी आणि एमबाप्पेच्या आधी 2001 मध्ये ब्राझीलच्या रोनाल्डिन्होला पॅरिस सेंट जर्मेनने करारबद्ध केलं. त्याने पुढच्याचवर्षी 2002 मध्ये ब्राझीलला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं. मेस्सीला फिफा वर्ल्ड कप 2022 चा गोल्डन बॉल अवॉर्ड मिळाला. एमबाप्पेला गोल्डन बूट अवॉर्ड मिळाला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.