Mayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले पहिले शतक

Mayank Agrawal | पंजाबच्या मयंक अग्रवालची तुफानी खेळी, आयपीएलमध्ये झळकावले पहिले शतक

पंजाबचा सलामीवीर मंयक अग्रवाल याने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले आहे. 106 धावांच्या खेळीत त्याने 7 षटकार आणि 10 चौकार लगावले.(Mayank Agrawal Maiden Century in the IPL)

Yuvraj Jadhav

|

Sep 27, 2020 | 10:21 PM

शारजा- किंग्ज इलेव्हन पंजाबचा खेळाडू मयंक अग्रवाल याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध धुवांधार खेळी करत शतक झळकावले आहे. मयंकने  45 चेंडूत 7 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. आयपीएलमधील हे त्याचे पहिले शतक ठरले. 106 धावा करुन मयंक अग्रवाल टॉम करनच्या गोलंदाजीवर बाद झाला.  मयंकने त्याच्या शतकी खेळीत 50 चेंडूमध्ये 10 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 106 धावा केल्या. (Mayank Agrawal Maiden Century in the IPL)

26 चेंडूमध्येच मयंकने अर्धशतक पूर्ण केले होते. मयंक अग्रवालला श्रेयस गोपालच्या गोलंदाजीवर जीवदान मिळाले. मयंकने याचा फायदा घेत शतकी खेळी केली.  पंजाबचा कर्णधार के.एल. राहुल यानेही अर्धशतकी खेळी केली आहे. के.एल. राहुलने 69 धावा केल्या. 1 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने त्याने मयंक अग्रवाल सोबत 183 धावांची भागिदारी रचली.

राजस्थानसमोर 224 धावांचे आव्हान

पंजाबच्या संघाने 20 षटकांमध्ये 223 धावा केल्या आहेत. पंजाबच्या दोन्ही सलामीवीर फलदांजांनी राजस्थानच्या गोलदांजांविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली. मयंक आणि राहुल यांनी 183 धावांची भागिदारी केली.   दरम्यान, राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.  पंजाबचे दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 13  तर निकोलस पूरन याने 25 धावा केल्या. राजस्थानच्या टॉम करण याने मयंक अग्रवाल याला बाद केले. अंकित राजपूत यांने के एल राहुल याला बाद केले.

संबंधित बातम्या-

IPL 2020, RR vs KXIP Live Score Update : मयंक-लोकेशचा तडाखा, राजस्थानला विजयासाठी 224 धावांचे तगडे आव्हान

IPL 2020 | आजीच्या निधनाचे दुःख सारुन वॉटसन मैदानात, सोशल मीडियावर चाहत्यांकडून सलाम

(Mayank Agrawal Maiden Century in the IPL)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें