IPL 2020 | आजीच्या निधनाचे दुःख सारुन वॉटसन मैदानात, सोशल मीडियावर चाहत्यांकडून सलाम

IPL 2020 | आजीच्या निधनाचे दुःख सारुन वॉटसन मैदानात, सोशल मीडियावर चाहत्यांकडून सलाम

आपल्या आजीला गमावल्याचे दुःख बाजूला ठेवूनच आपण मैदानावर उतरलो, अशी जाहीर वाच्यता त्याने दिल्लीविरुद्ध झालेल्या पराभवानंतर केली.

अनिश बेंद्रे

|

Sep 27, 2020 | 12:32 PM

दुबई : आयपीएल 2020 मध्ये आतापर्यंतच्या सुमार कामगिरीबद्दल चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Superkings) संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसन (Shane Watson) याला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, मात्र फारच कमी जणांना त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील दुःखाची कल्पना आहे. वॉटसनच्या आजीचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. ही दुःखद बातमी समजवल्यावर वॉटसनवर टीकेची झोड उठवणाऱ्या चाहत्यांनीच त्याला सलामही ठोकला. (Shane Watson Reveals He Played DC Game After Overcoming Personal Tragedy Of Grandmother’s Death)

आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध मैदानात उतरलेला ऑस्ट्रेलियाचा हा धुरंधर खेळाडू केवळ 4 धावांवर बाद झाला. चेन्नईने सामना जिंकला असला, तरी शेनला सोशल मीडियावर चाहत्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले.

राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या पुढील दोन सामन्यात शेन वॉटसनने अनुक्रमे 33 आणि 14 धावा केल्या. खराब फलंदाजीमुळे आव्हानाचा पाठलाग करताना सीएसकेने दोन्ही सामने गमावले. मात्र आपल्या आजीला गमावल्याचे दुःख बाजूला ठेवूनच आपण मैदानावर उतरलो, अशी जाहीर वाच्यता त्याने दिल्लीविरुद्ध झालेल्या पराभवानंतर केली.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शुक्रवारी झालेल्या लढतीच्या दोन दिवस आधी म्हणजेच बुधवारी वॉटसनची आजी (आईची आई) रिची यांचे निधन झाले. त्याने आपल्या आई आणि कुटुंबियांना सांत्वनपर सदिच्छा पाठवल्या आणि या कठीण प्रसंगी तिथे हजर न राहू शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

“मला घरच्यांना प्रेमाचे चार शब्द सांगायचे आहेत. मला माहित आहे, की माझ्या आईसाठी आजी किती महत्त्वाची होती. माझं हृदय कुटुंबासाठी तीळतीळ तुटतं. मी आत्ताच तिथे येऊ शकत नसल्याने दिलगीर आहे” असे शेन वॉटसनने आपल्या यूट्यूब शो ‘द डेब्रीफ’वर सांगितले. (Shane Watson Reveals He Played DC Game After Overcoming Personal Tragedy Of Grandmother’s Death)

मुंबईत काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डीन जोन्स यांनाही शेन वॉटसनने श्रद्धांजली वाहिली.

संबंधित बातम्या 

IPL 2020 : CSK चे सलग दोन पराभव, सुरेश रैना परतणार का? संघ व्यवस्थापक म्हणतात….

Suresh Raina | धोनीशी वाद झाल्याने रैनाची माघार ? CSK मालक श्रीनिवास यांचा दुजोरा

(Shane Watson Reveals He Played DC Game After Overcoming Personal Tragedy Of Grandmother’s Death)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें