IPL 2020, RR vs KXIP : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय

85 धावा करणारा संजू सॅमसन ठरला 'मॅन ऑफ द मॅच' | ( Rajasthan Royals vs Kings Eleven Punjab Live Score )

IPL 2020, RR vs KXIP : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय

शारजा : शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings Eleven Punjab)  4 विकेटने पराभव केला आहे. राहुल तेवतिया राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला आहे. तेवतियाने अवघ्या 31 बॉलमध्ये 7 सिक्सच्या मदतीने तुफानी 53 धावा केल्या. ( Rajasthan Royals vs Kings Eleven Punjab Live Score )

तेवतियाने निर्णायक क्षणी 18 व्या ओव्हरमध्ये शेल्डॉन कॉट्रेलच्या बोलिंगवर 5 बॉलवर 5 सिक्स ठोकले. या फटकेबाजीमुळे सामना राजस्थानच्या बाजूने झुकला. राजस्थानकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 85 धावा केल्या. तर कर्णधार स्टीवन स्मिथने 50 धावांची खेळी केली. पंजाबकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या राजस्थानची फारशी चांगली सुरुवात झाली नाही. राजस्थानला पहिला झटका 19 धावांवर बसला. जॉस बटलर 4 धावांवर बाद झाला. यानंतर संजू सॅमसन मैदानात आला. संजूने कर्णधार स्टीव्हन स्मिथला चांगली साथ दिली. दुसऱ्या विकेटसाठी या दोघांनी 81 धावा जोडल्या. यादरम्यान स्टीव्हन स्मिथने अर्धशतक पूर्ण केले. मात्र अर्धशतक पूर्ण केल्यानंतर स्टीव्हन स्मिथ 50 धावांवर बाद झाला.

यानंतर चौथ्या क्रमांकावर राहुल तेवतिया मैदानात आला. तेवतियाने  फार संथ सुरुवात केली. मात्र दुसऱ्या बाजूला संजू सॅमसनने बाजू धरुन ठेवली होती. संजूने या दरम्यान अर्धशतक पूर्ण केलं. राहूल आणि संजूने राजस्थानच्या विजयाचा पाया रचला.

राहूल आणि संजूने तिसऱ्या विकेटसाठी 61 धावा जोडल्या. राजस्थानला 161 धावांवर निर्णायक क्षणी तिसरा धक्का लागला. संजू सॅमसन 85 धावांवर बाद झाला. राहुलने या खेळीत 7 सिक्स आणि 4 फोर लगावले.

यानंतर आलेल्या रॉबिन उथप्पाला विशेष काही करता आले नाही. उथप्पा स्वसतात बाद झाला. यानंतर मैदानात असलेल्या राहुल तेवतियाने शेल्डन कॉट्रेलच्या 18 व्या ओव्हरमध्ये तब्बल 5 सिक्स लगावले. तेवतियाच्या या खेळीनंतर सामना राजस्थानच्या बाजूने झुकला. मात्र यानंतर राहुल 53 धावांवर बाद झाला. राहुलने आपल्या खेळीत 7 सिक्स लगावले. यानंतर रियान पराग भोपळा न फोडता बाद झाला. मात्र जोफ्रा आर्चरने 2 बॉलवर 2 सिक्स ठोकले. अशाप्रकारे राजस्थानने 3 बॉलआधी 4 विकेट्सने पंजाबवर विजय मिळवला.

दरम्यान त्याआधी राजस्थानने टॉस जिंकला. टॉस जिंकत पंजाबला फलंदाजीसाठी भाग पाडले. फंलंदाजी करायला आलेल्या पंजाबच्या केएल राहुल आणि मयंक अगरवाल या सलामीवर जोडीने राजस्थानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. लोकेश आणि मयंक या दोघांनी पंजाबला चांगली सुरुवात दिली.

सलामीवीर मयंक अगरवालने 45 चेंडूत शतक पूर्ण केलं. दोघांमध्ये तब्बल 183 धावांची सलामी भागीदारी केली. पंजाबला मयंकच्या रुपात पहिला धक्का लागला. मयंकने 106 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 सिक्स आणि 10 फोर लगावले.या मागोमाग कर्णधार लोकेश राहुलही 69 धावा करुन बाद झाला.

यानंतर ग्लेन मॅक्सवेलने 13 तर निकोलस पूरनने नाबाद 25 धावा केल्या. राजस्थानकडून अंकित राजपूत आणि टॉम करनने प्रत्येकी 1 बळी घेतला.

Picture

राहुल तेवतिया ठरला राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार

27/09/2020,11:18PM
Picture

अटीतटीच्या सामन्यात राजस्थानचा विजय

27/09/2020,11:14PM
Picture

राजस्थानला सहावा दणका

27/09/2020,11:12PM
Picture

राजस्थानला पाचवा धक्का

27/09/2020,11:10PM
Picture

राहुल तेवतियाची फटकेबाजी

27/09/2020,11:04PM
Picture

राजस्थानला 51 धावांची आवश्यकता

27/09/2020,10:58PM
Picture

राजस्थान 17 ओव्हरनंतर

27/09/2020,10:57PM
Picture

संजू सॅमसन बाद

27/09/2020,10:53PM
Picture

राजस्थान 16 ओव्हरनंतर

27/09/2020,10:51PM
Picture

राजस्थानला विजयासाठी 84 धावांची आवश्यकता

27/09/2020,10:47PM
Picture

राजस्थान 15 ओव्हरनंतर

27/09/2020,10:47PM
Picture

राजस्थान 14 ओव्हरनंतर

27/09/2020,10:41PM
Picture

राजस्थान 13 ओव्हरनंतर

27/09/2020,10:32PM
Picture

राजस्थान 12 ओव्हरनंतर

27/09/2020,10:31PM
Picture

संजू सॅमसनचे अर्धशतक पूर्ण

27/09/2020,10:28PM
Picture

संजू सॅमसनला 49 धावांवर जीवनदान

27/09/2020,10:27PM
Picture

राजस्थान रॉयल्स 11 ओव्हरनंतर

27/09/2020,10:23PM
Picture

10 ओव्हरनंतर राजस्थानच्या धावा

27/09/2020,10:19PM
Picture

राजस्थान 9 ओव्हरनंतर

IPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राजस्थान 100-2 ( 9 over) संजू सॅमसन – 35*, राहुल तेवतिया – 0* https://www.tv9marathi.com/sports/ipl-2020-rr-vs-kxip-live-score-update-today-cricket-match-rajasthan-royals-vs-kings-eleven-punjab-live-score-273971.html #IPL2020 #IPL #RRvKXIP #KXIP #KXIPvsRR

27/09/2020,10:17PM
Picture

राजस्थानला दुसरा धक्का

27/09/2020,10:14PM
Picture

कर्णधार स्टीव्ह स्मिथचे अर्धशतक पूर्ण

27/09/2020,10:13PM
Picture

राजस्थान 8 ओव्हरनंतर

27/09/2020,10:09PM
Picture

राजस्थान 7 ओव्हरनंतर

27/09/2020,10:01PM
Picture

दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 50 धावांची भागीदारी

27/09/2020,9:57PM
Picture

राजस्थान 6 ओव्हरनंतर

27/09/2020,9:55PM
Picture

राजस्थान 5 ओव्हरनंतर

27/09/2020,9:50PM
Picture

राजस्थानची 4 ओव्हरनंतर धावसंख्या

27/09/2020,9:48PM
Picture

राजस्थान 3 ओव्हरनंतर

27/09/2020,9:41PM
Picture

राजस्थानला पहिला धक्का

27/09/2020,9:37PM
Picture

राजस्थानचा 2 ओव्हरनंतर स्कोअर

27/09/2020,9:35PM
Picture

राजस्थान 1 ओव्हरनंतर

27/09/2020,9:30PM
Picture

राजस्थानच्या डावाला सुरुवात

27/09/2020,9:26PM
Picture

राजस्थानला विजयासाठी 224 धावांचे आव्हान

27/09/2020,9:09PM
Picture

पंजाब 20 ओव्हरनंतर

27/09/2020,9:09PM
Picture

पंजाब 19 ओव्हरनंतर

27/09/2020,9:04PM
Picture

पंजाब 18 ओव्हरनंतर

IPL 2020, RR vs KXIP Live Score Update : पंजाब 194-2 ( 18 over) निकोलस पूरन – 0*, ग्लेन मॅक्सवेल – 10*

27/09/2020,8:59PM
Picture

पंजाबला दुसरा धक्का

27/09/2020,8:58PM
Picture

पंजाब 17 ओव्हरनंतर

27/09/2020,8:54PM
Picture

पंजाबला पहिला धक्का

27/09/2020,8:52PM
Picture

पंजाब 16 ओव्हरनंतर

27/09/2020,8:48PM
Picture

पंजाब 15 ओव्हरनंतर

27/09/2020,8:47PM
Picture

मयंक अगरवालचे शतक

27/09/2020,8:46PM
Picture

पंजाबची 14 ओव्हरनंतर धावसंख्या

27/09/2020,8:38PM
Picture

13 ओव्हरनंतर पंजाबचा स्कोअर

27/09/2020,8:32PM
Picture

पंजाब 12 ओव्हरनंतर

27/09/2020,8:29PM
Picture

कर्णधार लोकेश राहुलचे 35 चेंडूत अर्धशतक

27/09/2020,8:27PM
Picture

11 षटकांनंतर पंजाबची धावसंख्या

27/09/2020,8:23PM
Picture

पंजाब 10 ओव्हरनंतर

27/09/2020,8:19PM
Picture

मयंक-लोकेश यांच्यात 100 धावांची भागीदारी

27/09/2020,8:17PM
Picture

पंजाबच्या 100 धावा पूर्ण

27/09/2020,8:13PM
Picture

मयंकचे दणदणीत अर्धशतक

27/09/2020,8:11PM
Picture

मयंक अगरवालचा धमाका

27/09/2020,8:07PM
Picture

पंजाबचा 7 ओव्हरनंतर स्कोअर

27/09/2020,8:02PM
Picture

पंजाबच्या पावर प्लेमध्ये 60 धावा

27/09/2020,7:58PM
Picture

पंजाबची 5 ओव्हरनंतर धावसंख्या

27/09/2020,7:54PM
Picture

50 धावांची सलामी भागीदारी

27/09/2020,7:50PM
Picture

पंजाब 4 ओव्हरनंतर

27/09/2020,7:48PM
Picture

पंजाबची 3 ओव्हरनंतर धावसंख्या

27/09/2020,7:45PM
Picture

किंग्ज इलेव्हन पंजाबची 2 ओव्हरनंतर धावसंख्या

27/09/2020,7:39PM
Picture

पंजाब 1 ओव्हरनंतर

27/09/2020,7:35PM
Picture

पंजाबच्या डावाला सुरुवात

27/09/2020,7:31PM
Picture

पंजाबचे किंग्स इलेव्हन

27/09/2020,7:16PM
Picture

राजस्थान रॉयल्सचे अंतिम 11 खेळाडू

27/09/2020,7:12PM
Picture

राजस्थानने टॉस जिंकला

https://twitter.com/IPL/status/1310210385006469129

27/09/2020,7:03PM

राजस्थानने आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची विजयी सुरुवात केली आहे. तर पंजाबला पहिल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला होता.

राजस्थान विरुद्ध पंजाब

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत यो दोन्ही संघांनी एकमेकांविरोधात एकूण 19 सामने खेळले आहेत. या 19 सामन्यांपैकी 10 सामने राजस्थानने जिंकले आहेत. तर पंजाबने राजस्थानचा 9 वेळा पराभव केला आहे. ( Rajasthan Royals vs Kings Eleven Punjab Live Score )

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *