MCA अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘पाटील vs पाटील’ चुरस टळली

| Updated on: Oct 01, 2019 | 8:03 AM

संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी बाळ महाडदळकर पॅनलची घोषणा करण्यात आली आहे. महाडदळकर पॅनलवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मजबूत पकड आहे. पण यंदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि बहुजन विकास आघाडी या राजकीय पक्षाशी निकट संबंध असलेल्या व्यक्ती महाडदळकर पॅनलमध्ये आहेत.

MCA अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाटील vs पाटील चुरस टळली
Follow us on

मुंबई : एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असताना भारतातील क्रिकेटच्या पंढरीत चार ऑक्टोबरला एक महत्त्वाची निवडणूक होत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदासाठी ही निवडणूक (MCA President Election) होणार आहे. मात्र विजय पाटील अध्यक्षपदी बिनविरोध निवडले जाण्याची चिन्हं आहेत. विजय पाटील यांना शरद पवार, उद्धव ठाकरे, आशिष शेलार यांची युती असलेल्या महाडदळकर गटाचा पाठिंबा आहे.

एमसीएच्या अध्यक्षपदासाठी विजय पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे, तर भारताच्या पहिल्या विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू संदीप पाटीलही अध्यक्षपदासाठी (MCA President Election) अर्ज भरण्याच्या तयारीत होते. मात्र तांत्रिक कारणांमुळे निवडणुकीत ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना टळला.

क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि समालोचक म्हणून संदीप पाटील यांनी नाव कमावलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचेही ते अध्यक्ष होते, तर शिवाजी पार्क जिमखान्याचेही ते सदस्य आहेत. त्यामुळे संदीप पाटील यांचं पारडं जड मानलं जात होतं.

लोढा समितीच्या शिफारशीनुसार काही तांत्रिक बाबींची पूर्तताही करावी लागते. परंतु बीसीसीआयच्या नियमांमध्ये संदीप पाटील यांची उमेदवारी अडकली. संदीप पाटील सध्या समालोचन करत असल्यामुळे निवडणूक जिंकल्यास परस्पर हितसंबंधांचा मुद्दा (Conflict of Interest) निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे विजय पाटील यांच्यासाठी काही नेतेमंडळीही पुढे सरसावली होती. विजय पाटील यांना एमसीएच्या प्रशासनाचा चांगलाच अनुभव आहे.

ऐतिहासिक झेप घेतोय, निवडणूक लढवतोय : आदित्य ठाकरे

संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी बाळ महाडदळकर पॅनलची घोषणा करण्यात आली आहे. महाडदळकर पॅनलवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मजबूत पकड आहे. पण यंदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि बहुजन विकास आघाडी या राजकीय पक्षाशी निकट संबंध असलेल्या व्यक्ती महाडदळकर पॅनलमध्ये (MCA President Election) आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संचालक मंडळावर निवडून येण्यासाठी अनोखी युती झाल्याचं पाहायला मिळत आहे.

MCA निवडणुकीत मतदार कोण?

शरद पवार
आशिष शेलार
उद्धव ठाकरे
आदित्य ठाकरे
जितेंद्र आव्हाड
राहुल शेवाळे
मिलिंद नार्वेकर
सचिन अहिर
प्रसाद लाड
पंकज ठाकूर