AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohammed Shami : मोहम्मद शमीसाठी इंग्लंडमधून आली वाईट बातमी, मोठा झटका

Mohammed Shami : भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीसाठी इंग्लंडमधून वाईट बातमी आली आहे. मोहम्मद शमीचा सध्या संघर्ष सुरु आहे. टीम इंडियाचा हा टॉप क्लास गोलंदाज आहे. 2023 वनडे वर्ल्ड कपच्या फायनलनंतर मोहम्मद शमी फारसा चमकलेला नाही. आता त्याच्यासाठी एक बॅड न्यूज आहे.

Mohammed Shami : मोहम्मद शमीसाठी इंग्लंडमधून आली वाईट बातमी, मोठा झटका
Mohammed Shami Image Credit source: PTI
| Updated on: Jun 12, 2025 | 9:51 AM
Share

भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे. यावेळी इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही. याच दरम्यान त्याच्यासाठी एक वाईट बातमी आली आहे. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 चा फायनल सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरु आहे. हा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला जात आहे. WTC फायनल दरम्यान मोहम्मद शमीच्या नावावर असलेला एका मोठा रेकॉर्ड मोडला.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 फायनलच्या पहिल्यादिवशीच इतिहास रचला. त्याने आयसीसी टुर्नामेंट्सच्या फायनलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर त्याने हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. स्टार्क या सामन्यात शानदार प्रदर्शन करताना मोहम्मद शमीचा रेकॉर्ड मोडला. फायनलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आता मिचेल स्टार्कच्या नावावर झालाय.

शमीवर अशी केली मात

मिचेल स्टार्कने या सामन्यात आतापर्यंत दोन विकेट घेतले आहेत. पाच आयसीसी फायनलमध्ये त्याच्या नावावर 11 विकेट आहेत. यामुळे तो सर्वात पुढे आहे. याआधी मोहम्मद शमी चार फायनलमध्ये 10 विकेट घेऊन या लिस्टमध्ये टॉपवर होता. स्टार्कची ही कामगिरी मोठ्या सामन्यात शानदार प्रदर्शन करण्याची त्याची क्षमता दाखवून देते. फायनलमध्ये पहिल्याच दिवशी पहिल्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेला झटके देऊन स्टार्कने आपली छाप उमटवली. त्याने एडन मार्करामला खात न उघडताच आऊट केलं. रयान रिकेलटनला 16 धावांवर तंबूत पाठवलं. या प्रदर्शनाच्या बळावर दिवसअखेरीस त्याच्या नावार 2/10 असा आकडा आहे.

आता त्याच्यासमोर काय लक्ष्य असेल?

WTC फायनलमध्ये मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेच्या टीमला दबावाखाली आणलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 4 बाद 43 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 212 धावांवर आटोपला. स्टार्कच्या गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला या कसोटीत पुनरागमन करता आलं. आज दुसऱ्यादिवशी दक्षिण आफ्रिकेच्या टीमवर दबाव असेल. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्यांदा WTC फायनलच जेतेपद मिळवून देण्याचा स्टार्कचा प्रयत्न असेल.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.