मिताली राजने रोहित आणि विराटलाही मागे टाकलं

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटमध्ये मिताली राजने अनेक विक्रम नावावर केले आहेत. पण तिने आता भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही मागे टाकलं आहे. महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर मानली जाणाऱ्या मितालीने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 2283 धावा पूर्ण केल्या आहेत. रोहित शर्माच्या नावावर 2207 धावा आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक …

मिताली राजने रोहित आणि विराटलाही मागे टाकलं

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटमध्ये मिताली राजने अनेक विक्रम नावावर केले आहेत. पण तिने आता भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही मागे टाकलं आहे. महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर मानली जाणाऱ्या मितालीने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 2283 धावा पूर्ण केल्या आहेत. रोहित शर्माच्या नावावर 2207 धावा आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी मिताली पहिलीच भारतीय फलंदाज ठरली आहे.

विशेष म्हणजे मिताली आणि रोहित यांनी प्रत्येकी 80 इनिंगमध्ये या धावा केल्या आहेत. महिला क्रिकेटमध्ये मिताली चौथ्या क्रमांकावर आहे. तिच्या पुढे न्यूझीलंडची सुझी बेट्स (2996), वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर (2691) आणि इंग्लंडची एडवर्ड (2605) यांचा क्रमांक लागतो.

मितालीच्या खात्यात 17 अर्धशतकं जमा आहेत. तर रोहितच्या नावावर चार शतकं आणि 15 अर्धशतकं आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये महिला आणि पुरुषांच्या सर्वाधिक धावांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर विराट कोहली आहे. त्याने 58 इनिंगमध्ये 2102 धावा केल्या आहेत. यानंतर महिला संघाची कर्णधार हरमनप्रीतचा क्रमांक लागतो, त्यानंतर सुरेश रैना आणि धोनी यांचा क्रमांक लागतो.

मिताली राजची दमदार खेळी आणि गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने गुरुवारी टी-20 विश्वचषकात आयर्लंडचा 52 धावांनी पराभव करुन सेमीफायनलमध्ये धडक मारली. भारताने आयर्लंडला विजयासाठी सहा बाद 145 धावांचं आव्हान दिलं होतं. पण आयर्लंडला आठ बाद 93 धावांपर्यंतच मजल मारता आली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *