IND vs ENG: रोहितच्या खराब फॉर्मवर मॉर्न मॉर्केलचं विधान चर्चेत, इंग्लंडविरुद्ध मॅचपूर्वी काय म्हणाले?

भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज रंगणार आहे आणि त्यानंतर रोहित शर्मा निवृत्त होणार की नाही याबाबत आता कोच मॉर्ने मॉर्केलने विधान केले आहे.

IND vs ENG: रोहितच्या खराब फॉर्मवर मॉर्न मॉर्केलचं विधान चर्चेत, इंग्लंडविरुद्ध मॅचपूर्वी काय म्हणाले?
morne morkel on rohit sharma
| Updated on: Jul 19, 2026 | 8:23 AM

भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेत तीन वनडे सामना आहेत.  दोन सामने आधीच खेळले गेले आहेत तर एक सामना आज खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर रोहित शर्मा निवृत्त होणार अशी चर्चा मागील सामना संपल्यापासून सुरु आहे. आता रोहित शर्मा खरंच निवृत्त होणार की खेळत राहणार यावच अनेकांनी अनेक विधान केले आहे. सामन्यापूर्वी भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी रोहित शर्मावर भाष्य केले. रोहित शर्माच्या सध्याच्या खराब फॉर्मवर मॉर्केल यांनी आपले मत मांडले आहे.

सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत मॉर्न मॉर्केल म्हणाले, “नवीन चेंडूने फलंदाजी करणे सोपे नाही. संपूर्ण मालिकेत चेंडू खूप स्विंग होताना आपण पाहिला आहे. अशा परिस्थितीत डावाची सुरुवात करणे आव्हानात्मक आहे. पण रोहित नक्कीच मार्ग काढेल यात शंका नाही. त्याने हे यापूर्वीही केले आहे. तो एक अनुभवी खेळाडू आहे आणि फलंदाजीच्या क्रमात एक विशिष्ट संयम आणि संतुलन आणतो. त्यामुळे, त्याच्या दृष्टिकोनाबद्दल कोणतीही चिंता नाही.” तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल इतरही काही चिंता आहेत. दुसऱ्या सामन्यात विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी भारतीय डावाला चांगली स्थिरता दिली, परंतु मधल्या फळीला याचा फायदा घेता आला नाही आणि भारताचा संघ अवघ्या 233 धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडने हा सामना चार गडी राखून जिंकला.

मॉर्न मॉर्केल म्हणाले की, “भारतीय फलंदाजांनी लॉर्ड्सच्या खेळपट्टीचा वेग आणि उसळी समजून घेतल्यानंतरच आक्रमक फटके खेळले पाहिजेत. लॉर्ड्सची खेळपट्टी कधीकधी अवघड ठरू शकते. फलंदाजांना सुरुवातीला पाच ते दहा अतिरिक्त चेंडू देऊन परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे ठरेल. आमच्या आघाडीच्या आणि मधल्या फळीतील प्रमुख फलंदाजांना खूप अनुभव आहे. त्यांना परिस्थितीची जाणीव आहे आणि भागीदारी कशी करायची हे त्यांना माहीत आहे. हे सर्वात महत्त्वाचे असेल. भारतीय वेगवान गोलंदाज मधल्या षटकांमध्ये बळी घेण्याचा मार्ग शोधतील. मधल्या षटकांमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त उसळीचा फायदा घेण्यासाठी आम्ही प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रारसारख्या गोलंदाजांचा वापर केला. पण या षटकांमध्ये विकेट्स घेणे खूप महत्त्वाचे आहे. मला वाटते की त्या दिवशी जो रूटने शानदार फलंदाजी केली.”

मॉर्केल म्हणाला, “दक्षिण आफ्रिकेत राहून आणि तिथे 20 वर्षे क्रिकेट खेळून मला जो अनुभव मिळाला आहे, तो निश्चितच उपयोगी पडेल. विश्वचषकाच्या नियोजनाबाबत चर्चा सुरू आहे आणि वेळ आल्यावर आम्ही त्या दिशेने पुढे जाऊ शकतो. मी माझे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेत शिकलो. मला तिथल्या खेळपट्ट्यांची माहिती आहे. मी माझा अनुभव संघासोबत नक्कीच शेअर करेन.”

Follow Us