MS Dhoni: क्रिकेटनंतर आता रेसिंगची क्रेझ, 45व्या वयात Gen Z लाही लाजवेल अशी एनर्जी, धोनीचा Video तुफान व्हायरल
अनेक माजी क्रिकेटपटू निवृत्त झाल्यापासून मनोसक्त आयुष्य जगताना दिसतायेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यापासून आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगताना अनेकदा महेंद्रसिंग धोनी दिसतो. धोनीला गाड्यांचा किती छंद आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. आता नुकताच धोनी चेन्नईमध्ये बाईक चालवताना दिसला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतानही दिसत आहे.

अनेक माजी क्रिकेटपटू निवृत्त झाल्यापासून मनोसक्त आयुष्य जगताना दिसतायेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यापासून आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगताना अनेकदा महेंद्रसिंग धोनी दिसतो. धोनीला गाड्यांचा किती छंद आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. धोनी कित्येकदा बाईक राईड करताना दिसतो. त्याचे बाईक रायडिंगचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. आता नुकताच धोनी चेन्नईमध्ये बाईक चालवताना दिसला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतानही दिसत आहे. धोनी जिथे जिथे जातो तिथे तिथे त्याचे चाहते त्याचा फॉलो करत पोहोचतात.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, धोनी आंतरराष्ट्रीय सर्किटवर आपल्या राईडचा आनंद घेताना दिसला. त्याने कोणतीही कसर न सोडता, अतिशय वेगाने काही फेऱ्या पूर्ण केल्या. तो पिट लेनमध्ये परत येताच, फोटोग्राफर्सनी त्याला घेरले. या 45 वर्षीय दिग्गजाने आपले हेल्मेट काढले आणि शेकडो उत्साही चाहत्यांना हात दाखवला. त्याच्या राईडचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरले आणि गर्दीत उत्साह संचारला. धोनीसाठी, वाहनांबद्दलची आपली आवड जोपासण्याची ही एक उत्तम संधी होती. धोनीचे तामिळनाडू/चेन्नई कनेक्शन हे सर्वांनाच माहिता. संपूर्ण देशातच धोनीची क्रेझ आहे पण चेन्नईमध्ये एक विशेष क्रेझ पाहायला मिळते.
Mahi riding my favorite bike😭🔥 pic.twitter.com/FOwqdqaRS5
— 𝗦💛 (@mostlydhoni78) August 3, 2026
धोनी मागील हंगामात चेन्नई सुपर किंग्ज या संघाचा भाग होता पण त्याला दुखापतीमुळे एकही सामना खेळता आला नाही. आता पुढील हंगामात तो कदाचित कोच म्हणून संघाचा कारभार सांभाळेल अशी चिन्हे दिसत आहेत. मुख्य प्रशिक्षक राहिलेले स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर CSK सोडले आहे, आणि धोनीसोबतची त्यांची शानदार नेतृत्वाची भागीदारी संपुष्टात आणली आहे. या भागीदारीमुळे संघाने पाच आयपीएल विजेतेपदे आणि दोन चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकल्या. पुढील चक्राच्या पार्श्वभूमीवर फ्रँचायझी आपल्या क्रिकेट कामकाजाचा आढावा घेऊ लागली असताना, संघाच्या रचनेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. काही जण तर अशीही अटकळ बांधत आहेत की धोनी संघाचा पुढील प्रशिक्षक होऊ शकतो, पण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की तो अजून निवृत्त झालेला नाही.
