AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखरपुडा झाला, लग्न होण्यापूर्वीच शरीरसंबंध ठेवले; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर खळबळजनक आरोप

जोधपूरमधील एका तरुणीने IPLमधील मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या एका खेळाडूवर गंभीर आरोप केले आहेत. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे तरुणीने तक्रारीमध्ये म्हटले आहे.

साखरपुडा झाला, लग्न होण्यापूर्वीच शरीरसंबंध ठेवले; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर खळबळजनक आरोप
IPL Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 03, 2025 | 11:52 AM
Share

गुजरातमधील बडोदा येथील आयपीएल क्रिकेटपटू शिवालिक शर्मा याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. राजस्थानमधील जोधपूरच्या एका तरुणीने त्याच्यावर साखरपुड्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. क्रिकेटपटू शिवालिक शर्मा याच्याविरुद्ध जोधपूरच्या कुडीभागतासनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने तक्रारीमध्ये सांगितले की, शिवालिकने तिला फसवून तिच्यावर घरात अनेकदा बलात्कार केला आहे.

पीडितेने पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, फेब्रुवारी 2023 मध्ये ती आपल्या मित्रांसह बडोदा फिरायला गेली होती, तेव्हा तिची शिवालिकशी ओळख झाली. त्यावेळी त्यांच्यात संवाद झाला आणि त्यांनी एकमेकांचे मोबाइल नंबर घेतले. तरुणीने सांगितले की, दोन दिवसांनंतर ती जोधपूरला परतली, तेव्हापासून तिचे आणि शिवालिकचे मेसेजद्वारे फोनवर बोलणे सुरू झाले आणि त्यांच्यात जवळीक वाढली.

वाचा: 23 वर्षीय शिक्षिका 8वीच्या मुलासोबत पळाली, सत्य समोर येताच पोलिसही थक्क झाले

लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने बलात्कार

पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले की, 28 ऑगस्ट 2023 रोजी त्यांचा साखरपुडा झाला. त्यासाठी शिवालिक जोधपूरला आला होता. त्यानंतर त्यांचे फोनवर बोलणे सुरू झाले. तरुणीचा आरोप आहे की, 27 मे 2024 रोजी शिवालिक तिला भेटण्यासाठी जोधपूरला तिच्या घरी आला. घरी कोणीही नव्हते, तेव्हा शिवालिकने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तिने नकार दिल्यावर शिवालिकने तिच्याशी लग्न करण्याचे आमिश दाखवले. आरोप आहे की, शिवालिकने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत गैरकृत्य केले.

मेहंदीपूर बालाजी, जयपूर आणि उज्जैन फिरले

तरुणीचा आरोप आहे की, 3 जून 2024 पर्यंत शिवालिक तिच्या घरी राहिला आणि तिच्या संमतीशिवाय तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत राहिला. या काळात शिवालिक तिला मेहंदीपूर बालाजी, जयपूर आणि उज्जैनला फिरायला घेऊन गेला. 7 जून 2024 रोजी ते जोधपूरला परतले आणि पुन्हा गैरकृत्य केले. यावेळी शिवालिक 14 जूनपर्यंत तिच्या घरी राहिला आणि नंतर बडोद्याला परतला. त्यानंतर शिवालिक पुन्हा 28 जून 2024 रोजी जोधपूरला आला आणि तिच्या घरी राहिला.

नाते तोडले, अपमानास्पद बोलणे

तरुणीने पोलिसांना सांगितले की, लग्नाच्या चर्चेसाठी शिवालिकने तिला बडोद्याला बोलावले. ती 10 ऑगस्ट रोजी बडोद्याला पोहोचली. यावेळी शिवालिकचे वागणे बदललेले दिसत होते. त्याने तिची आपल्या आई-वडिलांशी भेट करुन दिली. त्यानंतर शिवालिकच्या आई-वडिलांनी तिला खुप सुनावले. तिचा अपमान केला. त्यांनी सांगितले की, शिवालिक आता क्रिकेटपटू झाला आहे आणि त्याच्यासाठी अनेक मुलींचे प्रस्ताव येत आहेत. असे म्हणत त्यांनी तिच्याशी नाते तोडले आणि तिला हाकलून दिले.

शिवालिकवर धमकीचा आरोप

तरुणीचा आरोप आहे की, शिवालिकच्या कुटुंबीयांनी तिच्या आई-वडिलांना फोनवर लग्नास नकार दिला. ती जोधपूरला परतली आणि तिने शिवालिकशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवालिकने तिला धमकी दिली. तरुणीने सांगितले की, जर तिने याबाबत कोणाला सांगितले तर तो तिला उद्ध्वस्त करेल अशी धमकी शिवालिकने दिली. तरुणीने सांगितले की, तिच्या साखरपुड्यावर 15 ते 20 लाख रुपये खर्च झाले होते. त्यापैकी 5 लाख रुपये रोख देण्यात आले होते. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.