AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर झालेल्या रहस्यमयी त्या मृत्यूचा उलगडा, अखेर सत्य समोर आलच

मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर एक धक्कादायक घटना समोर आली. बीसीसीआयशी संबंधित ब्रिटिश ब्रॉडकास्ट इंजिनिअरचा नरीमन पॉइंट येथील हॉटेलमध्ये मृत्यू झाला.

मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर झालेल्या रहस्यमयी त्या मृत्यूचा उलगडा, अखेर सत्य समोर आलच
विल्यम लँगफर्डImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Apr 01, 2026 | 2:58 PM
Share

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) यांच्यातील आयपीएल २०२६ सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने १३ वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडून विजय मिळवला. मात्र, या विजयानंतर दुसऱ्याच दिवशी एक धक्कादायक आणि गूढ घटना समोर आली. ७६ वर्षीय ब्रिटिश नागरिक जन विल्यम लँगफर्ड यांचा मुंबईतील नरिमन पॉइंट येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये निधन झाले आहे. ते इंडियन प्रीमियर लीग (IPL) साठी बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (BCCI) शी संबंधित ब्रॉडकास्ट इंजिनिअर म्हणून काम करत होते.

३० मार्च रोजी विल्यम लँगफर्ड आपल्या हॉटेल रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. ते काही दिवसांपासून IPL च्या कामानिमित्त हॉटेलमध्ये मुक्कामाला होते, असे पोलिसांनी सांगितले.ते २४ मार्चपासून हॉटेलच्या रूम नंबर २७१५ मध्ये मुक्कामाला होते. ३० मार्च रोजी सकाळी रिसेप्शनिस्टने त्यांना फोन केला, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. हॉटेल कर्मचाऱ्यांनी रूममध्ये जाऊनही उत्तर न मिळाल्याने मास्टर कीने रूम उघडली. आत गेल्यानंतर कर्मचाऱ्यांना ते बेशुद्ध अवस्थेत आढळले.

त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. मृतदेहाचा शवविच्छेदन करण्यात येणार आहे. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद घटना आढळलेली नाही. “सध्या तरी कोणतीही संशयास्पद बाब आढळली नाही. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवालानंतरच समजेल,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने एका वृत्तवाहिनीला सांगितले आहे.

तपास सुरू

या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात अ‍ॅक्सिडेंटल डेथ रिपोर्ट (ADR) नोंदवण्यात आली आहे आणि पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. झोन-१ चे डेप्युटी कमिशनर ऑफ पोलिस डॉ. प्रवीण मुंडे यांनी या घटनेची पुष्टी केली. ते म्हणाले की, व्यक्ती हॉटेल रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळला आणि नंतर हॉस्पिटलमध्ये त्याला मृत घोषित करण्यात आले.

कोण होते जन विल्यम लँगफर्ड?

जन विल्यम लँगफर्ड हे मूळचे ब्रिटिश नागरिक होते आणि आयपीएल २०२६ साठी मुंबईत ब्रॉडकास्ट इंजिनिअर म्हणून काम करत होते. या गूढ मृत्यूमुळे आयपीएल वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?