
टीम इंडियाचे सगळे खेळाडू मुंबईत क्वारंन्टाईन आहेत. टीम इंडिया येत्या 2 जून रोजी इंग्लंडला जाण्यासाठी टेक ऑफ करेल. मात्र तिकडे न्यूझीलंडने भारतीविरुद्ध जिथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळायचा आहे त्या महामुकाबल्याच्या जागी, म्हणजेच साऊथॅम्प्टनच्या मोकळ्या हवेत सराव सुरु केला आहे.

25 मे रोजी न्यूझीलंडच्या संघाने पहिलं सराव सत्र आयोजित केलं होतं. यावेळी किवी कर्णधार केन विल्यमसन फलंदाजीचा सराव करताना दिसला.

फलंदाजीचा सराव करतानाही किवी कर्णधार आणि खेळाडू रणनीती बनवत होते, यामध्ये कर्णधार केन विल्यमसन पुन्हा एकदा सक्रिय दिसला.

27 मे रोजी न्यूझीलंडचे संघ दोन विभागून सराव सामनाही खेळेल आणि वेळी WTC फायनअगोदर इंग्लंडविरुद्धची मालिका देखील..... विल्यमसन विरुद्ध लॅथम असा हा सामना रंगेल.

न्यूझीलंडच्या संघाला WTC फायनलअगोदर इंग्लंडविरुद्ध 2 कसोटी सामने खेळायचे आहेत. किवी खेळाडूंच्या म्हणण्यानुसार त्यांचं संपूर्ण लक्ष त्या सामन्यावर आहे. मात्र सराव करताना भारताविरुद्ध विशेष रणनिती बनविण्यात न्यूझीलंडचे क्रिकेटपटू अग्रेसर होते. त्यामुळेच कहीं पर निगाहें, कही पर निशाणा, असं आपल्याला म्हणावं लागेल.