AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final : न्यूझीलंडच्या गोलंदाजांना विराट-रोहित नव्हे, तर टीम इंडियाच्या ‘या’ नवख्या खेळाडूची धास्ती

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ याच्या तयारीला लागले आहेत.

WTC Final : न्यूझीलंडच्या गोलंदाजांना विराट-रोहित नव्हे, तर टीम इंडियाच्या 'या' नवख्या खेळाडूची धास्ती
Rishabh Pant, Virat Kohli - Team India
| Updated on: May 24, 2021 | 10:32 PM
Share

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपचा (ICC WTC Final) अंतिम सामना इंग्लंडमध्ये 18 जूनपासून खेळवला जाणार आहे. आयसीसीच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ आपआपली रणनीती आखण्यात व्यस्त असताना न्यूझीलंडच्या संघाने विराट, रोहित आणि पुजारा या दिग्गजांसह आणखी एका भारतीय फलंदाजाचा चांगलाच धसका घेतला आहे. ऋषभ पंत (Rishabh Pant) असं त्या खेळाडूचं नावं आहे. (Not Virat, Rohit or Pujara but Rishabh Pant is New Zealand bowlers biggest headache said by bowling coach Shane Jurgensen)

न्यूझीलंड संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन जुर्गेन्सन (New Zealand’s bowling coach Shane Jurgensen) यांच्या मते न्यूझीलंडच्या संघासाठी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे ते आपल्या प्रमुख गोलंदाजासह मिळून पंतला टार्गेट करण्याची राजनीति आखत आहेत

ऋषभ पंतला घाबरण्याचे मुख्य कारण

ऑस्ट्रेलियामधील गाबाच्या मैदानात भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात पंतने सिंहाचा वाटा उचलला होता. त्यानंतर आयपीएलमध्ये देखील पंतने दमदार प्रदर्शन केल्यामुळे न्यूझीलंडच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली आहे.

पंत विरोधात किवीजची रणनीती

न्यूझीलंडचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन जुर्गेन्सन यांच्या मते ”ऋषभ पंत एक खतरनाक फलंदाज असून त्याच्यात खेळ पलटण्याची ताकद आहे, आपण सर्वांनीच ऑस्ट्रेलियात त्याला असं करताना पाहिलं आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सिरीजमध्ये देखील त्याने अप्रतिम कामगिरी केल्याने आम्ही त्याला लवकर बाद करण्याच्या दृष्टीने तयारी करत आहोत,

न्यूझीलंड संघाची तयारी

भारतीय संघ बायो-बबलच्या नियमांचे पालन करत सराव करणार असून न्यूझीलंडचा संघ मात्र आधीपासूनच इंग्लंडमध्ये असल्याने त्यांचा सराव पूर्ण जोमात सुरु आहे. ते इंग्लंडसोबत दोन सराव सामनेदेखील खेळणार आहेत. त्यांच्याकडून डेवॉन कॉन्वे हा युवा फलंदाज पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे भारताचा फिरकीपटू आर. अश्विनच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी टफ पिचवर न्यूझीलंडचे फलंदाज सराव करत आहेत. तर दुसरीकडे त्यांचे गोलंदाज पंत, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांना रोखण्यासाठी कसून सराव करत आहेत.

इतर बातम्या

IPL 2021 : आयपीएलचे राहिलेले सामने आमच्या देशात नको, तिकडे UAE ला जा

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात BCCI मैदानात, 2000 ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स देण्याची घोषणा

Video : कॉमेन्ट्रीमधून भल्याभल्यांना क्रिकेट शिकवणारा आकाश चोप्रा जेव्हा ब्रेट ली च्या बोलिंगवर चळचळा कापतो!

(Not Virat, Rohit or Pujara but Rishabh Pant is New Zealand bowlers biggest headache said by bowling coach Shane Jurgensen)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.