कोरोनाविरुद्धच्या लढ्यात BCCI मैदानात, 2000 ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स देण्याची घोषणा

BCCI ने कोरोना विषाणूशी लढा देणाऱ्या नागरिकांना मदत करण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स (Oxygen Concentrator) देण्याची घोषणा केली आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात BCCI मैदानात, 2000 ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स देण्याची घोषणा
BCCI

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कोरोना विषाणूशी (Corona Virus) लढा देणाऱ्या नागरिकांना मदत करण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स (Oxygen Concentrator) देण्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयकडून 10 लीटरचे 2000 कॉन्सेट्रेटर्स प्रदान केले जातील. हे कॉन्सेट्रेटर्स येत्या काही महिन्यांत संपूर्ण भारतात वितरित केले जातील. (BCCI to contribute 10 Litre 2000 Oxygen concentrators to boost India s efforts in overcoming the COVID-19 pandemic)

बीसीसीआयने एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, यामुळे गरजूंना आवश्यक वैद्यकीय मदत मिळेल. तसेच साथीच्या आजारामुळे होणारा त्रासही कमी होईल. भारतातील कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे बरेच नुकसान झाले आहे. यामुळे वैद्यकीय पुरवठा व ऑक्सिजनची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. ऑक्सिजनअभावी बर्‍याच लोकांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.

बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याबाबत म्हणाला की, कठीण काळात वैद्यकीय आणि आरोग्य सेवांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आरोग्य कर्मचारी पुढे आले आणि त्यांनी लढाई केली, लोकांना वाचवण्यासाठी सर्व काही केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ देखील आरोग्य आणि सुरक्षिततेस महत्त्व देत आहे. अशा मदतीसाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्सची रुग्णालयांना आवश्यकता आहे. त्यामुळे आम्ही कॉन्सेट्रेटर्स वितरित करण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी विरुष्काने जमवले 11 कोटी

संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा या दोघांनी कोरोना विरुद्ध लढा देण्याचा निर्धार केला आहे. दोघांनी स्वत:पासून सुरुवात केली. या दोघांनी 2 कोटींची आर्थिक मदत जाहीर केली. त्यानंतर या दोघांनी इतरांना मदतीसाठी आवाहन केलं. अवघ्या काही दिवसांमध्ये विरुष्काच्या आवाहनाला लोकांनी भरभरुन दाद दिली आहे. या कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी आतापर्यंत 11 कोटींची रक्कम जमली आहे. या अभियानांतर्गत जमा होणारी रक्कम कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

विरुष्काने सुरुवातीला केटो संस्थेच्या सोबतीने 7 कोटी रक्कम जमा करण्याचा निर्धार केला होता. मात्र आता त्यापेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे. विरुष्काच्या आवाहनानंतर एमपीएल स्पोर्ट्स फाऊंडेशननेही 5 कोटींची मदत केली. विरुष्काने गेल्या 2 वर्षात विविध समाजपयोगी कार्यसाठी 5 कोटींची आर्थिक मदत केली आहे. विरुष्काने कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळेस 3 कोटींची मदत केली होती. तर या वेळेस दोघांनी 2 कोटींची मदत जाहीर केली.

कोहलीने काही दिवसांपूर्वी मदतीची घोषणा करताना म्हणाला होता की, “आपला देश यावेळेस अडचणीतून जात आहे. यावेळेस आपण एक होण्याची आणि अधिकांचे प्राण वाचवण्याची आवश्यकता आहे. वर्षभरापासून अनेक लोकं अडचणीतून जात आहेत. हे पाहून आम्हाला यातना होत आहेत.”

इतर बातम्या

Corona Cases in India | देशात एकूण कोरोनाबळींचा आकडा तीन लाखांपार, एका दिवसात 4400 हून अधिक मृत्यू

देशात ब्लॅक फंगसचं थैमान! 18 राज्यात 5 हजारपेक्षा जास्त रुग्ण, 55 टक्के रुग्णांना मधुमेह – आरोग्यमंत्री

(BCCI to contribute 10 Litre 2000 Oxygen concentrators to boost India s efforts in overcoming the COVID-19 pandemic)