AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात ब्लॅक फंगसचं थैमान! 18 राज्यात 5 हजारपेक्षा जास्त रुग्ण, 55 टक्के रुग्णांना मधुमेह – आरोग्यमंत्री

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार 24 मे रोजी सकाळपर्यंत देशातील एकूण 18 राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे (ब्लॅक फंगस) एकूण 5 हजार 424 रुग्ण आढळून आले आहेत.

देशात ब्लॅक फंगसचं थैमान! 18 राज्यात 5 हजारपेक्षा जास्त रुग्ण, 55 टक्के रुग्णांना मधुमेह - आरोग्यमंत्री
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन
| Updated on: May 24, 2021 | 2:49 PM
Share

मुंबई : देशात कोरोनाच्या प्रादुर्भावासह आता ब्लॅक फंगस अर्थात म्युकरमायकोसिस या आजारानं थैमान घातलंय. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वेगाने होणाऱ्या वाढीसह त्याचा धोकाही वाढलाय. अशावेळी अनेक राज्यांमध्ये ब्लॅक फंगसला महामारी घोषित करण्यात आलंय. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार 24 मे रोजी सकाळपर्यंत देशातील एकूण 18 राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे (ब्लॅक फंगस) एकूण 5 हजार 424 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. (More than 5,000 cases of black fungus in 18 states of the country)

डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये 2 हजार 165, महाराष्ट्रात 1 हजार 188, उत्तर प्रदेशात 663, मध्य प्रदेशात 519, हरियाणात 339 आणि आंध्र प्रदेशात 248 म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. देशात आढळलेल्या म्युकरमायकोसिसच्या 5 हजार 424 रुग्णांपैकी 4 हजार 556 जणांना कोरोनाची लागण झाली होती, तर 55 टक्के रुग्णांना पहिल्यापासूनच मधुमेहाची समस्या होती.

साखरेचं प्रमाण नियंत्रणात नसलेल्या व्यक्तीला धोका

निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्लॅक फंगस हा आजार कोरोनाच्या आधीही अस्तित्वात होता. तसंच हा आजार मधुमेह असलेल्या व्यक्तीला, ज्यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात नाही अशा लोकांना जास्त धोका असल्याचं वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी सांगतात. साखरेचं प्रमाण नियंत्रणात नसण्याबरोबरच अन्य आजारही ब्लॅक फंगसचे कारण बनू शकतात.

रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना धोका

डॉ. पॉल यांनी सांगितलं की, ज्यांची शुगर लेव्हल 700 ते 800 पर्यंत पोहोचते, त्याला डायबिटीक कीटोएसीडोसिस असंही म्हणतात. अशा रुग्णांना ब्लॅक फंगसचा धोका अधिक असतो. अशास्थितीत मुलांपासून वृद्धांपर्यंत कुणीही या आजाराला बळी पडू शकतो. दरम्यान, स्वस्थ व्यक्तीला ब्लॅक फंगसमुळे घाबरुन जाण्याची गरज नाही. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, अशा लोकांनाच या आजाराचा जास्त धोका असल्याचं एम्सचे डॉ. निखिल टंडन यांनी म्हटलंय.

ब्लॅक, व्हाईटनंतर आता यलो फंगसचाही धोका

ब्लॅक फंगसपाठोपाठ व्हाईट फंगसनेही देशात थैमान घातले आहे. त्यानंतर आता येलो फंगसने दस्तक दिली आहे. उत्तर प्रदेशात येलो फंगसचा पहिला रुग्णही सापडला आहे. ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षा येलो फंगस अधिक धोकादायक आणि खतरनाक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं असून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. या येलो फंगसला म्युकोर सेप्टिकस हे नाव देण्यात आलं आहे. येलो फंगस आढळून आलेला रुग्ण गाझियाबादचा राहणारा आहे. 34 वर्षाच्या या तरुणाला आधी कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्याला मधुमेहाचाही त्रास आहे. ईएनटी सर्जन डॉक्टर बृज पाल त्यागी त्याच्यावर उपचार करत आहेत.

संबंधित बातम्या :

नगर, यवतमाळ, सिंधुदुर्गसह 14 जिल्हे रेड झोनमध्ये, तुमच्या जिल्ह्याची परिस्थिती काय?

मुंबईतील पुढील आठवड्याचं लसीकरण नियोजन जाहीर, ‘या’ 3 दिवशी बुकिंगची गरज नाही, थेट केंद्रावर येणाऱ्यांना लस

More than 5,000 cases of black fungus in 18 states of the country

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.