AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील पुढील आठवड्याचं लसीकरण नियोजन जाहीर, ‘या’ 3 दिवशी बुकिंगची गरज नाही, थेट केंद्रावर येणाऱ्यांना लस

पुढील आठवड्यात मुंबईत कोणत्या दिवशी कुणाला लस घेता येणार याबाबत मुंबई महानगरपालिकेने सविस्तर वेळापत्रक जाहीर केलंय.

मुंबईतील पुढील आठवड्याचं लसीकरण नियोजन जाहीर, 'या' 3 दिवशी बुकिंगची गरज नाही, थेट केंद्रावर येणाऱ्यांना लस
| Updated on: May 23, 2021 | 9:40 PM
Share

मुंबई : कोरोना लसीकरण सुरळीत होण्यासाठी मुंबईत बीएमसीकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसारच पुढील आठवड्यात मुंबईत कोणत्या दिवशी कुणाला लस घेता येणार याबाबत मुंबई महानगरपालिकेने सविस्तर वेळापत्रक जाहीर केलंय. यानुसार 24 ते 26 मे 2021 दरम्यान 3 दिवस कोरोना लसीकरणासाठी स्लॉट बुकिंगची गरज असणार नाहीये. लसीकरण केंद्रावर थेट येणाऱ्यांचं जागेवरच लसीकरण (वॉक इन) होणार आहे. यानंतर 27 ते 29 मे 2021 या 3 दिवशी ऑनलाईन नोंदणी करूनच लसीकरण होणार आहे. तसेच रविवारी (30 मे 2021) रोजी लसीकरण बंद असणार आहे (Timetable of May 2021 Corona Vaccination in Mumbai by BMC).

कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबईकरांचे लसीकरण सुरळीत होण्यासाठी आणि लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळ, लसीच्या मात्रा याचा पुरेपूर व सुयोग्य वापर होण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सुधारित मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यात त्यांनी कुणाला कशी लस घेता येणार याबाबत सविस्तर माहिती दिलीय.

24 ते 26 मे 2021 दरम्यान लसीकरणासाठी थेट येण्याची (वॉक इन) मुभा कुणाला?

  • 60 वर्ष व 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील कोविशील्ड लसीच्या पहिल्या मात्रेचे लाभार्थी
  • 60 वर्ष 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या मात्रेसाठी पात्र लाभार्थी
  • आरोग्य कर्मचारी व आघाडीवरील (फ्रंटलाईन) इतर कर्मचारी यांच्यातील दुसऱ्या मात्रेचे पात्र लाभार्थी
  • 45 वर्ष व त्यावरील वयोगटातील दुसऱ्या मात्रेचे पात्र लाभार्थी

कोव्हॅक्सीन लस कुणाला घेता येणार?

  • कोव्हॅसीन लसीचा विचार करता सर्व वयोगटातील दुसऱ्या मात्रेसाठी पात्र लाभार्थी येवू शकतील.
  • 27 ते 29 मे 2021 या 3 दिवसात प्रत्येक केंद्रावर 100 टक्के लसीकरण कोविन प्रणालीवर नोंदणी केल्यानंतर आणि लसीकरण केंद्र व वेळ निश्चित झाल्यानंतरच (स्लॉट बुकींग) करण्यात येईल.
  • रविवारी 30 मे 2021 रोजी लसीकरण कार्यक्रम बंद राहील

बीएमसीचं मुंबईकरांना आवाहन

आठवड्यातील लसीकरणाच्या सदर नियोजनामध्ये अनपेक्षित कारणांनी काही बदल करावा लागल्यास त्याबाबतची पूर्वसूचना 1 दिवस आधी प्रसारमाध्यमं आणि समाज माध्यमं ह्यांच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यात येईल.

कोरोना लसीच्या दोन डोसमध्ये किती अंतर?

दरम्यान, केंद्र सरकारने अलिकडे केलेल्या सुचनेनुसार, कोविशील्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या मात्रांमध्ये पूर्वीच्या 6 ते 8 आठवड्यांऐवजी आता किमान 12 ते 16 आठवड्याचे अंतर असणे आवश्यक आहे. म्हणजेच कोविशील्ड लसीच्या पहिल्या मात्रेनंतर 84 दिवसांचे अंतर राखून दुसरी मात्रा दिली जाईल.

यानुसार, 1 मार्च 2021 पासून कार्यान्वित झालेल्या लसीकरण टप्प्यातील 60 वर्ष व 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांनी 1 मार्च 2021 रोजी कोविशील्ड लसीची पहिली मात्रा घेतली असल्यास त्यांना 24 मे 2021 अथवा 84 दिवसांनंतर दुसरी मात्रा देण्यात येणार आहे. यात आरोग्य कर्मचारी व आघाडीवर काम करणारे इतर कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांनाही याच अंतराने लसीचा दुसरा डोस घेता येणार आहे.

कोविड –19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या नियोजनाची योग्य अंमलबजावणी व्हावी, यासाठी मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन बीएमसीने केलंय.

हेही वाचा :

… तर कोव्हिशील्‍डच्या तिसऱ्या डोसने कोरोनाचा प्रत्येक विषाणू हरणार? वाचा नवा अभ्यास काय सांगतोय

कोव्हॅक्सिनपेक्षा कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोसनंतर जास्त अँटीबॉडी तयार होतात, ICMR प्रमुखांचा दावा

‘केंद्राच्या समितीतील तज्ज्ञांना जमिनीवरील वस्तूस्थितीची कल्पना नाही’, घरोघरी जाऊन लसीकरणाच्या मुद्द्यावर हायकोर्टाची तीव्र नाराजी

व्हिडीओ पाहा :

Timetable of May 2021 Corona Vaccination in Mumbai by BMC

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.