नवी जर्सी विराट कोहलीला आवडली का?

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विराटला ही जर्सी कशी वाटली याबाबत त्याने प्रतिक्रिया दिली.

नवी जर्सी विराट कोहलीला आवडली का?

ICC cricket world cup India vs England  लंडन : टीम इंडियाची नजर आता विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये धडक मारण्यावर आहे. भारताचा पुढील सामना 30 जून रोजी इंग्लंडविरुद्ध होत आहे. इंग्लंडवर मात केल्यास भारताचं सेमी फायनलचं स्थान पक्कं होईल. या सामन्यासाठी टीम इंडिया नव्या कोऱ्या भगव्या जर्सीत उतरणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विराटला ही जर्सी कशी वाटली याबाबत त्याने प्रतिक्रिया दिली. विराट म्हणाला, “नवी जर्सी भारी आहे. खरंतर ही जर्सी केवळ एकाच सामन्यासाठी घालायची आहे. आमच्या किटचा रंग निळा आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र भगवा रंगही छान आहे”


चौथ्या नंबरवर कोण?

दरम्यान, चौथ्या नंबरवर फलंदाजीला येणाऱ्या विजय शंकरच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याबाबत विराट कोहलीला विचारण्यात आलं. त्याबाबत विराट म्हणाला, “माझं वैयक्तीक मत सांगायचं झाल्यास, विजय एक जबरदस्त खेळाडू आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याने उत्तम फलंदाजी केली. तो चांगलं खेळत आहे”

विराट कोहलीच्या या प्रतिक्रियेमुळे विजय शंकरला टीममध्ये कायम ठेवण्याची त्याची मानसिकता असल्याचं दिसतं. पण तरीही विजय शंकर उद्याच्या सामन्यात खेळतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


शमीचं कौतुक

विराट कोहलीने मोहम्मद शमीच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. भुवनेश्वरच्या अनुपस्थितीत शमी जबरदस्त गोलंदाजी करत आहे, असं विराट म्हणाला. भुवीच्या समावेशाबाबत विचारलं असता, जे टीमसाठी आवश्यक असेल ते सर्व केलं जाईल, असं विराटने नमूद केलं. परिस्थितीनुसार खेळाडूची निवड केली जाईल, असंही तो म्हणाला.

संबंधित बातमी 

टीम इंडिया भगव्या रंगात खेळणार, बीसीसीआयकडून नव्या जर्सीचा फोटो शेअर  

टीम इंडियाच्या प्रस्तावित भगव्या जर्सीला अबू आझमींचा विरोध 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *